सातारा

उंब्रज : तुम्ही वाळू उपसा, आम्ही करतो कानाडाेळा; महसूलचा फंडा

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (जि.सातारा) : लॉकडाउनचा फायदा घेत उंब्रजसह परिसरातील नदीपात्रातून अवैध वाळूउपसा सुरू असून दिवस-रात्र नदीपात्रातून जेसीबीच्या साह्याने वाळूउपसा सुरू आहे. महसूल विभागाकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याने परिसरातील शेतकरी-ग्रामस्थांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे वाळू चोरट्यांना वाळू उपशासाठी मोकळे रान सापडले आहे. त्याचा फायदा घेत उत्तरमांड, तारळी, कृष्णा नदीपात्रातून रात्रंदिवस बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. लाखो रुपयांची वाळूविक्री केली जात आहे. वाळूचे डेपो मारले आहेत. अवैध वाळू डेपोवर महसूल विभाग कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. काही वाळू चोरट्यांची येथील शासकीय कर्मचाऱ्यांशी उठबस असल्याने या वाळू चोरट्यांचे खबरीच कर्मचारी असल्याचे स्थानिकांतून बोलले जात आहे. त्यातच कोरोनामुळे गावाच्या सीमा सील केल्याने महसूल विभाग गावात येत नाही. याचाच फायदा घेत वाळू चोरट्यांना खुलेआम वाळू उपशासाठी रान मोकळे झाले आहे. याकडे महसूल विभाग डोळेझाक करत आहे. बक्कळ पैसा कमवण्यासाठी वाळू चोरटे नदीपात्राची अक्षरश: चाळण करत आहेत. नदीपात्र खरवडून काढले आहे. या अवैध वाळू उपसामुळे पावसाळ्यात नदी काठावरील शेतकऱ्यांची राने वाहून जात आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली असता संबंधित चोरट्यांकडून तक्रारदारास दम देत आहेत. याकडे महसूल विभाग जाणूनबुजुन दुर्लक्ष करत असून महसूल विभागाला अगोदरच मालामाल केल्याची चर्चा नागरिकांत आहे. 

मोठ्या कारवाया गुलदस्त्यात..

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसावर धडक कारवाई होत आहे. परंतु, उंब्रज परिसरातील वाळू चोरट्यांवर आत्तापर्यंत कोणतीच मोठी कारवाई झाली नाही. चिरीमिरीची कारवाई करत येथील महसूल विभाग पाठ थोपटून घेत आहे. यापूर्वी अनेक कारवाया झाल्या. परंतु, कागदावर किरकोळ कारवाई येतात. अनेक मोठ्या कारवाया या गुलदस्त्यातच राहिल्याची चर्चा परिसरातील शेतकरी व नागरिकांत आहेत. 

लढा कोरोनाशी : लाखाे लाेकांसाठी सातारा जिल्हा परिषदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्राच्या नंदनवनात अशीही घुसमट...

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT