Murder
Murder sakal
सातारा

कऱ्हाड : मेव्हण्याला खुनाच्या कटात अडकवण्यासाठी प्रेयसीचा खून

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : बहिणाला त्रास देणाऱ्या मेव्हण्याला खुनाच्या गुन्ह्यात (Murder Crime) अडकविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या प्रेयसीचाच खून केल्याचे पोलिसांच्या तापासात (Police Investigation) उघड झाले आहे. कार्वे ते कोरेगाव रस्त्यावरील खूनाचे पोलिसांनी अवघ्या चार तासात उकलले आहे. त्यात प्रकरणी येरवळे येथील शरद हणमंत ताटे (वय ३३) यास पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

वनिता आत्माराम साळुखे (वय ३० रा. महिंद ता.पाटण) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. शरदने तीला फुस लावून कार्वे रस्त्यावर आणले. तेथे तीचा डोक्यात दगड घालून खून केला. त्याचवेळी मेव्हण्याचे आधार कार्ड तीच्याक़डे टाकून त्यांना यात अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे तोच प्रयत्न फसल्याने शरद ताटे अवघ्या चार तासात पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलिसांची माहिती अशी : परवा रात्री कार्वे येथे कोरेगाव रस्त्यावर भैरवनाथ मंदिरा शेजारीच कृष्णा नदीचे पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिलेचा खून झाल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तात्काळ घटनास्थळी येवून पोलिसांनी पहाणी केली. अनोळख्या महिलेचा डोक्यात दगड घालून खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या महिलेजवळ आधारकार्ड सापडले. त्यातील संबधिताकडे तपासणी केली तरिही पोलिसांच्या हाती काही सापडले नाही.

पोलिसांच्या चाणाक्षपणाने आधारकार्ड सापडलेल्या व्यक्तीच्या मेव्हणावर पोलिसांनी लक्ष केंद्रत केले. तालुका व सातारच्या एलसीबीच्या पथकाने संयुक्तपणे तपास करत अवघ्या चार तासात खूनाचे गुढ उकलले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी भेट देवून पहाणी केली. सातारा एलसीबीचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ, आनंदराव खोबरे यांच्या नेतृत्वाखाली तपास झाला. एलसीबीचे सहायक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे व फौजदार गणेश वाघ यांचे स्वंतत्र पथक तपास करत होते. त्यांनी तपासाची सुत्रे हलवली. मृत महिलेच्या अंगावर पडलेली चिठ्ठीच तपासाचा धागा बनली.

त्यावरील मजकुराने पोलिसांचे लक्ष वेधले. मला लग्न करतो म्हणुन आणले, माझ्याशी संबंध ठेवले व लग्न करत नाही. मारहाणही करतो आहे. माझ्याशी संबंध ठेवले आहेत मी जीव दिला किंवा माझे काही झाल्यास त्यास तो जबाबदार आहे, असा मजकुर लिहला होता चिठ्ठीमध्ये लिहलेल्या इसमाच्या आधारकार्डची झेरॉक्स होती.

त्या अनुषंगाने माहिती घेवून पथकाने तपास केला. चिठ्ठीत नाव असलेल्याचा संबध नव्हता मात्र त्याचा मेव्हणा म्हणजेच शरद ताटेकडे पोलिसांनी तपास केला. त्यावेळी शरदने दिलेली उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कौशल्याने तपास केला असता त्यावेळी शरदने खूनाची कबुली देत दोघांच्या प्रमेसंबधाची कबुलीही दिली. बहिणीला मारहाण कऱणाऱ्या मेव्हण्याला खूनाच्या गुन्हयात अडकवण्यासाठीच वनिताचा खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

पोलिस, उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलीस निरीक्षक धुमाळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक गर्जे, फौजदार वाघ, हवालदार शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन व तालुक्याचे फौजदार भरत कांबळे, हवालदार धनंजय कोळी, सजन जगताप, उत्तम कोळी यांनी यांनी तपासात भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT