tanker  esakal
सातारा

Satara : खटाव तालुक्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे

दोन वर्षांपासून टॅंकरची मागणीच नाही; जलसंधारणाची कामे ठरली उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा

कलेढोण : दुष्काळी खटाव तालुक्यात गत दोन वर्षांत झालेल्या समाधानकारक पावसाच्या हजेरीमुळे व गावागावांत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरला ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे दर वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून तालुका प्रशासनाकडून होणाऱ्या टँकरच्या मागणीला पूर्णविराम मिळाला आहे.

खटाव तालुक्यातील मुख्य पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या येरळवाडी, नेर, मायणी, येळीव या तलावांत पाणीसाठा उपलब्ध आहे. गत महिन्यात दुष्काळी पूर्व भागात उरमोडी व तारळीचे पाणी वाटप करण्यात आल्याने ठिकठिकाणचे छोटे तलाव पाण्याने भरून घेतले. गावागावांत नाम फाउंडेशन व पानी फाउंडेशनच्या व गत दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या समाधानकारक पावसाच्या हजेरीमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली.

त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आवळे पठार, पाचवड, अनफळे, गारुडी, औताडवाडी या प्रमुख टंचाईग्रस्त गावांकडून होणारी टँकर मागणीला ब्रेक लागला आहे. या गावांचे पाणीटंचाईचे संकट असलेल्या गावात जलसंधारणाची कामेही प्रगतिपथावर आहे.

टेंभूमुळे शेतीपाण्याचा प्रश्‍नही लागेल मार्गी...

पिण्याच्या पाण्याच्या संकटाबरोबर शेती पाण्याचाही प्रश्‍न तालुक्यातील गावांत जाणवतो. त्यात जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षबागांचा प्रमुख समावेश होतो. शेती पाण्यासाठी परजिल्ह्यातून टँकर मागणीही थंडावली आहे.

दरम्यान, टेंभूचे पाणी तालुक्यातील वंचित गावांना मिळावे, यासाठी शासनाकडून वंचित गावांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामास प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्यास तालुक्यातील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीपाण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

दर वर्षी फेब्रुवारीपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे प्रस्ताव दाखल होतात. मात्र, गावोगावच्या गावठाणात पुरेसा पाणीसाठा असल्याने गत दोन वर्षांपासून प्रशासनाकडे टॅंकर मागणीचा एकही प्रस्ताव तालुका प्रशासनाकडे दाखल झालेला नाही.

- शंकर झेंडे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT