अतिक्रमण तातडीने हटवा, अन्यथा आंदोलन; जनसंसदचा इशारा
अतिक्रमण तातडीने हटवा, अन्यथा आंदोलन; जनसंसदचा इशारा sakal
सातारा

कोरेगाव : अतिक्रमण तातडीने हटवा, अन्यथा आंदोलन; जनसंसदचा इशारा

राजेंद्र वाघ - सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील अस्ताव्यस्त पार्किंग अडचणीचे ठरत असून, आवारातील वाळूच्या ढिगाऱ्यांवरून घसरून वृद्ध, महिला, अपंगांना शारीरिक इजा होण्याचे प्रसंग बऱ्याचदा घडल्याने आवारातील अतिक्रमण तातडीने हटवून नागरिकांची गैरसोय दूर करावी. अन्यथा, आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय जनसंसद संघटनेच्या कोरेगाव शाखेने दिला आहे.

यासंदर्भात भारतीय जनसंसद संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुरेश येवले, तालुकाध्यक्ष रमेश माने, कोरेगाव शहराध्यक्ष प्रशांत गुरव, सदस्य हरिभाऊ रसाळ यांनी तहसीलदार कार्यालयास निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की तहसीलदार कार्यालयात तालुक्याच्या विविध भागांतून कामासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी लक्षणीय आहे. त्यामध्ये वृद्ध, महिला, अपंग व्यक्तींचा सामावेश आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयाचे आवार मोकळे व स्वच्छ, तसेच स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची गरज असताना तहसीलदार कार्यालयाचे चित्र मात्र वेगळेच दिसत आहे. तहसीलदार कार्यालयाने केलेल्या कारवाईतील मोठी अवजड वाहने, वाळूचे मोठे ढीग गेल्या कित्येक वर्षांपासून आवारात पडून आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंगही आवारातच असते. कार्यालयाच्या आवारात आत आल्यानंतर सेतू कार्यालय, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख कार्यालय, उपकोषागार कार्यालय अशी विविध कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये जाणाऱ्या लोकांना अस्ताव्यस्त लावलेली वाहने, वाळूच्या ढिगाऱ्यांचे अडथळे पार करून जावे लागते.

वाळूच्या ढिगाऱ्यांवरून घसरून वृद्ध, महिला, अपंगांना शारीरिक इजा होण्याचे प्रसंग बऱ्याचदा घडले आहेत. या सर्व अडचणींकडे गांभीर्याने पाहून तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी. अन्यथा भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT