सातारा

पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील शहरात अनिश्चित काळासाठी लाॅकडाउन; अत्यावश्‍यक सेवा मिळणार घरपोच

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिरवळ शहर हे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून प्रांताधिकारी यांनी जाहीर केले. यामुळे संपूर्ण शहर आजपासून शनिवार लॉकडाउन राहणार असून, अत्यावश्‍यक सेवा घरपोच दिली जाणार आहे. शिरवळ शहरातून एकही व्यक्ती शहरात ये- जा करू शकणार नाही, असे प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे.
 
शिरवळ शहराच्या प्रतिबंधक क्षेत्राच्या सर्व बाजूंच्या रस्त्याच्या सीमा पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधक क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद राहणार असून, फक्त अत्यावश्‍यक सेवा दूध, भाजीपाला, किराणामाल, औषधे, खते, बी-बियाणे इत्यादी सेवा घरपोच पद्धतीने सुरळीत सुरू ठेवण्याबाबत ग्रामसमितीने दक्षता घेण्याची असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण ज्या गल्ली किंवा मोहल्ला येथे आढळून आला आहे. त्या गल्लीमधून वैद्यकीय कारणाशिवाय कोणतेही नागरिक बाहेर पडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

अमावास्या, पौर्णिमेला भरणा-या दरबारात पाेलिसांचा छापा; भक्तांच्या समक्ष महाराजांना ठाेकल्या बेड्या 

याची काटेकोर अंमलबजावणी शिरवळ पोलिस निरीक्षक यांनी करावी, असे सांगण्यात आले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व रहिवाशांबाबत गृह व संस्था विलगीकरण यांची यादी तयार करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील संपूर्ण घराची विशेष पथकामार्फत तत्काळ सर्वेक्षण करून घेण्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांना सांगण्यात आले आहे.
 
दरम्यान, लॉकडाउन होणार हे नागरिकांचा समजल्यानंतर शिरवळ शहरात शुक्रवारी खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी झुंबड उडवली होती.

कष्टकऱ्यांच्या चळवळीचा नेता हरपला; बाळासाहेब बागवान यांचे निधऩ

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT