सातारा

कऱ्हाड : अत्याचार करुन खून केल्याने सुर्लीतील एकास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बंडा ऊर्फ नवनाथ चव्हाण (रा. सुर्ली) असे त्याचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी सुर्ली येथे ही घटना घडली होती.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 
11 मे 2012 रोजी रात्री एक अल्पवयीन मुलगी शेजारच्या घरी टीव्ही पाहण्यास गेली होती. रात्री 10.30 वाजले तरी ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तालुका पोलिसात तक्रार दिली. पोलिस तपासात गावातील आनंदा पवार यांनी संशयित बंडा सोबत मुलीला पाहिल्याचे समोर आले. त्यामुळे 13 मे 2012 रोजी पोलिसांनी संशयितास अटक केली. पोलिस तपासात त्याने मुलीस शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचे पुढे आले. तिचा मृतदेह ओघळीत पाला टाकून लपवला होता.

संशयिताने पोलिसांना माहिती देत स्वतः मृतदेह दाखवला होता. त्या प्रकरणी 30 जून 2012 रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाकडून ऍड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. खटल्यात 15 साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने खून, बलात्कार, अपहरण, पुरावा नष्ट करणे असे आरोप सिद्ध कले. त्या विविध कलमान्वये आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. भरपाईची रक्कम स्वतंत्र असल्याने संशयितास एकत्रित दोन लाख तीन हजारांचा दंड झाला आहे.

सातारा : कोरोनामुक्तीची मालिका सुरूच; 47 नागरिक बरे झाले

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार दारूची दुकाने सुरू राहू शकतात, मंदिरे का नाही? 

CoronaUpdate : खटाव, जावळीत काेराेना बाधितांची संख्या वाढली: खंडाळ्यातील एकाचा सारीने मृत्यु

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT