waghwale hospital system
सातारा

वाघावळेत डाॅक्टर नसल्याने नर्सच करताहेत रुग्णांवर उपचार

या ठिकाणी खास बाब म्हणून या दुर्गम भागातील रुग्णांसाठी वाघावळे येथे कोविड सेंटर उभारून औषधे, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर व सर्व इंजेक्‍शनचा पुरवठा करण्यात यावा, अशीही जनतेतून मागणी होत आहे. या निवेदनावर कोयना संघर्ष समितीचे अध्यक्ष एच. बी. जंगम आणि सचिव संदीप कदम यांच्या सह्या आहेत. हे निवेदन आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वरचे सभापती संजय गायकवाड व तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना दिले आहे.

रविकांत बेलाेशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर (mahableshwar) तालुक्‍यातील दुर्गम वाघावळे येथील आयुर्वेदिक दवाखाना व बेल एअर संस्थेच्या (belair management) आरोग्य केंद्रात डॉक्‍टर (doctor) नसल्याने येथील रुग्णांची परवड सुरू आहे. कोरोना संसर्गातच (coronavirus pandemic) या रुग्णालयाबरोबर या विभागातील रुग्णही व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कोयना धरणग्रस्त संघर्ष समिती मैदानात उतरली आहे. (satara-marathi-news-waghawale-doctor-nurse-belair)

कोयना धरणग्रस्त संघर्ष समितीने या समस्येबाबत निवेदन दिले आहे. कांदाटी या दुर्गम भागातील धरणग्रस्त 16 गावांच्या आरोग्यासाठी वाघावळे येथे बामणोली आयुर्वेदिक दवाखान्याचे उपकेंद्र असून बेल एअर आरोग्य केंद्र चालवत होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही विभागात डॉक्‍टर उपलब्ध नाहीत. कंपाउंडर व परिचारिकांचे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या कोविड महामारीने कांदाटी भागात शिरकाव केला असून विभागातील दोन रुग्ण दगावले आहेत. काही तळदेव येथे ऍडमिट आहेत. अनेक लोक आजारी आहेत. परंतु, त्यांना उपचारासाठी या दुर्गम भागात सोय नाही. तापोळे, महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाहतुकीची सोय नाही. खासगी वाहने बंद आहेत. या परिस्थितीचा विचार करून वाघावळे येथील दवाखान्यात त्वरित डॉक्‍टरांची नियुक्ती करावी. तसेच बेल एअरच्या आरोग्य केंद्रातही डॉक्‍टर उपलब्ध करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

या ठिकाणी खास बाब म्हणून या दुर्गम भागातील रुग्णांसाठी वाघावळे येथे कोविड सेंटर उभारून औषधे, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर व सर्व इंजेक्‍शनचा पुरवठा करण्यात यावा, अशीही जनतेतून मागणी होत आहे. या निवेदनावर कोयना संघर्ष समितीचे अध्यक्ष एच. बी. जंगम आणि सचिव संदीप कदम यांच्या सह्या आहेत. हे निवेदन आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वरचे सभापती संजय गायकवाड व तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा होणार बंद; 'या' तारखेपर्यंत दिली मुदत, राज्यात ८० लाख महिलांनी केलेली नाही e-KYC

Latest Marathi News Live Update : 2023 आणि 2024 राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार जाहीर; राष्ट्रपती मुर्मूंकडून सन्मान

Video : संकटात सापडलेल्या मालकाला वाचवायला धावतच आली म्हैस, मुक्या प्राण्याची निष्ठा पाहून तुमचेही डोळे पाणावतील, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Shahid Afridi : याला वाटतं, हाच शहाणा...! आफ्रिदीची गौतम गंभीरवर बोचरी टीका; रोहित, विराटला फुल्ल सपोर्ट

Year End : गुगलवर रात्रीच्या वेळेस सर्वांत जास्त काय सर्च झाले? 2025 च्या धक्कादायक रेकॉर्डने जग हादरलं

SCROLL FOR NEXT