Satara-Mhaswad-Pandharpur Central Highway
Satara-Mhaswad-Pandharpur Central Highway esakal
सातारा

'महामार्गासाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई द्या'; रस्त्यावर दोरखंड टाकत संतप्त शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

सल्लाउद्दिन चोपदार

केंद्र सरकारने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामुळे धुळदेव ग्रामपंचायत (Dhuldev Gram Panchayat) हद्दीतील रस्त्याचे बांधकाम करु दिले नाही.

म्हसवड : सातारा-म्हसवड-पंढरपूर या केंद्रीय महामार्गासाठी (Satara-Mhaswad-Pandharpur Central Highway) रस्त्यालगतच्या घेतलेल्या जमिनीची भरपाई द्यावी, या मागणीसाठी म्हसवडपासून सात किलो मीटर अंतरावरील धुळदेव येथील शेतकऱ्यांनी (Farmers) हा महामार्ग अडवून रस्ता बंद केल्याची घटना आज घडली.

सातारा-म्हसवड-पंढरपूर हा रस्ता पूर्वी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. केंद्र सरकारने तो ताब्यात घेऊन या रस्त्याचे रुंदीकरणासह सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरु केली. या रस्त्याची पुर्नबांधणी करताना रस्त्यालगतच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी या रस्त्यात घेतल्या गेल्या.

परंतु, त्या जमिनीची केंद्र सरकारने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामुळे धुळदेव ग्रामपंचायत (Dhuldev Gram Panchayat) हद्दीतील रस्त्याचे बांधकाम करु दिले नाही. परिणामी, या रस्त्यावर खोल खड्डे पडून वेळोवेळी वाहनांचे अपघात होण्याच्या घटना वाढीस लागल्या, याबरोबरच अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागले. जखमींची संख्या वाढू लागल्यामुळे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे संबंधित ठेकेदारांनी सुरु करण्याच्या हालचाली दिसून येताच येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर आडवा दोरखंड बांधून हा रस्ता वाहतुकीस बंद केला.

प्रारंभी या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या, नंतर संबंधित वाहन चालकांनी माळरानातून वाहने चालवत नेत पुढील काही अंतरावरील खुल्या रस्त्यावरुन पुढे मार्गस्थ झाली. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरु होते. शासनाने आमच्या जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी संबंधित रस्ताबाधित जमीनधारक शेतक-यांची होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलन मागे घेऊन रस्ता वाहतुकीस खुला करण्याबाबत प्रयत्न करीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनानंतर आणखी एका गूढ आजाराने डोकेदुखी वाढली! ही लक्षणे दिसली तर ४८ तासात रुग्णाचा मृत्यू निश्चित

IND vs AFG T20 WC Super-8 : कधीपासून रंगणार सुपर-8चा थरार? भारताचा पहिला सामना कोणाशी; जाणून घ्या Details

Nagpur Accident: नागपुरात आणखी एक कार अपघात! अल्पवयीन कार चालकाने पाच जणांना उडवलं, अल्पवयीन कारचालकासह...

Shubman Gill : दोस्त दोस्त ना रहा... गिलने कर्णधार रोहितला केलं अनफॉलो, मोठं कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

SCROLL FOR NEXT