Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

महाबळेश्‍वरात 'अवकाळी'ने हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट; शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : आधीच थंडीने गारठलेल्या महाबळेश्वर व जावळी तालुक्‍यात सध्या रोज अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिके पूर्ण झोपली आहेत. अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकरी हैराण झालेत. या सततच्या पावसामुळे थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घालावे की रेनकोट घालावा, अशा संभ्रमात सध्या नागरिक आहेत.
 
दोन्ही तालुक्‍यांत सध्या रब्बी हंगामाची ज्वारी, हरभरा, गहू ही पिके प्रामुख्याने घेतली आहेत. त्यामध्ये ज्वारी हे पीक सध्या या पावसाचे लक्ष्य झाले असून शेतातील ऐन भरात आलेली ज्वारी पावसाने पूर्णपणे शेतात कोलमडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्वारी भुईसपाट झालेली दिसते. ज्वारी आणि गव्हाची अवस्था सारखीच झाली. दाणे धरल्यामुळे दोन्ही पिके काळी पडून नुकसानीत अधिक वाढ झाली.

अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पोचणार नसल्याने दाणे भरणार नाहीत आणि कणसे काळवंडणारही आहेत. करडई, सुर्यफूल, इतर पिकांनाही मोठा फटका बसला. पिके अंतिम टप्प्यात असताना पावसाने घाला घातला. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. बेलोशी, दापवडी, रुईघर, महू परिसरात ज्वारी व गहू मोठ्या प्रमाणात घेतली जातो. दोन दिवसांच्या पावसाने बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी कोलमडली आहे. अगोदरच शेतकरी वन्यप्राण्यांमध्ये हतबल झाले असताना पीक वाचवत आहे. परंतु; त्यातच या अस्मानी संकटाने शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT