Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

भाविकांनी 365 दिवसांत 431 कोटी 95 लाख 40 हजार 'श्रीरामनाम जपा'चा संकल्प केला पूर्ण!

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : "श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक'च्या आरोळीपाठोपाठ श्रीराम नामाच्या गजरात "श्रीं'च्या 107 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीवर शुक्रवारी गुलाल-फुले वाहण्यात आली. यंदा प्रथम भाविकांच्या गर्दीविना हा सोहळा साजरा करण्यात आला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "श्रीं'चा पुण्यतिथी महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन समाधी मंदिर समितीने केले होते. त्यानुसार 31 डिसेंबर रोजी कोठीपूजनाने या महोत्सवाला सुरुवात झाली. परंपरेनुसार परंतु, शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत समाधी मंदिरात पुजारी, सेवेकरी, कर्मचाऱ्यांनी धार्मिक विधी पूर्ण केले. यंदा प्रथमच "श्रीं'च्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा व अन्नदान झाले नाही. मात्र, "श्रीं'च्या पादुका वाहनातून श्रीराम भेटीसाठी नेण्यात आल्या, तर ग्रामस्थांना घरपोच प्रसाद देण्यात आला. 

समाधी मंदिरात पहाटे काकड आरतीनंतर वेदघोष करण्यात आला. त्यानंतर "रघुपती राघव राजाराम'चा जयघोष करून पाच वाजून 55 मिनिटांनी समाधीवर गुलाल-फुले वाहण्यात आली. श्रीराम नामाच्या जयघोषात उपस्थितांनी समाधीचे दर्शन घेतले. समाधीवर यंदा 431 कोटी 95 लाख 40 हजार इतका श्रीरामनाम जप अर्पण करण्यात आला व पुढील वर्षासाठी नव्याने संकल्प करण्यात आला. दरम्यान, सकाळी आठच्या सुमारास रामदासी भिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मंदिरच बंद ठेवण्यात आले होते. प्रशासनानेदेखील संचारबंदी केल्यामुळे मंदिर परिसरात व सातारा-पंढरपूर रस्त्यावर शुकशुकाट होता.

नेटक्‍या नियोजनामुळे गर्दी टाळण्यात यश 

"श्रीं'च्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त यात्रा रद्द केल्याने यंदा पोलिस यंत्रणा वगळता प्रशासनावर ताण नव्हता. समाधी मंदिर समिती व दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केलेल्या नेटक्‍या नियोजनामुळे या महोत्सवातील गर्दी टाळण्यात यश मिळाले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT