Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाड शहरात अतिक्रमणे सुसाट, पालिकेची नेमकी कोणाला साथ?

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : गाजावाजा करत मागील वर्षाच्या मार्चमध्ये शहरातील अतिक्रमणे पालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत येथे जमीनदोस्त झाली. व्यापाऱ्यांचा विरोध असूनही तात्पुरती, पक्की अतिक्रमणे पाडली गेली. त्या वेळी अतिक्रमण विरोधी पथक तयार करण्याची घोषणा झाली. त्याला वर्षाचा कालवधी लोटला तरीही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. कोरोनाचे कारण सांगत पालिका काहीच करण्यास तयार नव्हीत. आता स्वच्छ सर्वेक्षणचा कारण सांगून त्या कारवाईत चालढकल होताना दिसते आहे. कारवाईला पालिकेत पथकच अस्तित्वात नसल्याने बाजारपेठेतील अतिक्रमणे सुसाट आहेत. 

मागील वर्षी शहरात तात्पुरती व कायमची 600 हून अधिक अतिक्रमणे हटवली. बाजारपेठेतील दुकानांचे फलक काढण्यावरून अधिकारी व स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींत वाद झाला. त्या वेळी समन्वयाच्या सात बैठका झाल्या. मात्र, त्यात सुचवलेल्या एकाही पर्यायावर हालचाल आजअखेर झालेली नाही. केवळ वेळ मारून नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत बैठक केल्या होत्या, ते आजच्या घडीला स्पष्ट झाले आहे. त्याच कालावधीत पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाची घोषणा झाली. त्याची निर्मिती वर्षभरानंतरही कागदावरही नाही, हेच वास्तव आहे. शहरात तबब्ल 13 वर्षांपासून अतिक्रमण विरोधी पथक आहे. मात्र, ते केवळ कागदावरच दिसते. त्याचे काहीच काम नाही. केवळ घोषणा होते, प्रत्यक्षात पथकच बेपत्ता असते, अशी स्थिती आहे. 

मागील वर्षी अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते झाली. मात्र, कोरोनाच्या काळातील फायदा घेत शहरात पुन्हा अतिक्रमणे वाढली आहेत. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी गटारीवर पायऱ्या बांधल्या आहेत. कट्टेही तसेच उभारले जात आहेत. शहरातील व्यापाऱ्यांनी ठराविक एकाच आकाराचे फलक मिळतील, असे पालिकेने पर्याय दिला होता. त्यावरही अंतिम निर्णय न झाल्याने आता मोठाले फलक पुन्हा झळकू लागले आहेत. हातगाडेधारकांचेही अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमण हटविताना हातगाडेधारकांनी पालिकेला मदत केली. हॉकर्स झोन ठरविण्याचा निर्णय घेतला, त्यांचाही प्रश्न अद्याप पालिकेला सोडवता आलेला नाही. पालिका कोणतीच भूमिका नेटाची घेत नसल्याने शहरात अतिक्रमण वाढत आहेत. त्यावर कारवाईसाठी विरोधी पथकही नसल्याने ती अतिक्रमणे सुसाट होताहेत. 

तुम्हाला माहितीय? 15 व्या शतकातील चीनी कलाकृतीच्या Porcelain Bowl ची किंमत $500,000 डॉलर्स इतकी आहे!

वस्तुस्थितीवर एक नजर... 

  • व्यापाऱ्यांनी बांधल्या पुन्हा गटारावरच पायऱ्या अन्‌ कट्टे 
  • अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडलेली बांधकामे पुन्हा उभारली आहेत 
  • व्यापाऱ्यांना राजकीय अभय असल्याने पालिका करतेय दुर्लक्ष 
  • पक्की बांधकामेही रातोरात उभी करण्याचा सपाटा 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे पुन्हा CM? पण खरा गेम कोण खेळतोय? गणित थक्क करणारं… २ तारखेनंतरचा ‘राजकीय स्फोट’ खरा की फक्त अफवा?

Pune Traffic : नवले पूल परिसरात मोठे बदल, आता 'या' रस्त्यावरून थेट महामार्गावर प्रवेश बंद; अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Kolhapur Love Marriage : लव्ह मॅरेजमुळे सासूनं छळलं, मुलगा होऊनही पतीची नाही साथ; शेवटी ५ महिन्याच्या बाळाला सोडून 'ती'ने सोडलं जग

Junior Hockey World Cup : आजपासून ज्युनियर हॉकी विश्वकरंडक; यजमान भारताला तिसऱ्या विजेतेपदाची संधी...

SCROLL FOR NEXT