Satara Latest Marathi News 
सातारा

सातारा-पंढरपूर महामार्गावरील शिंदेवाडीत फॅक्टरीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शिंदेवाडी (कटगुण, ता. खटाव) येथील माळरानावर असलेल्या डुरियम डोअर्स इंडस्ट्रीज कंपनीला रविवारी (ता. २८) सकाळी सात वाजता आग लागली. लॅमिनेटेड दरवाजे उत्पादित करणारी ही फॅक्टरी असून या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

शिंदेवाडी आणि निढळ या दोन्ही गावाच्या मधोमधच ही डोअर्स कंपनी आहे. दरम्यान, ही आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी कंपनीकडे धाव घेतली. तसेच कंपनीचे मालक वसंत पटेल (रा. पुसेगाव) यांना कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाशी वेळेत संपर्क न झाल्यामुळे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी उशीर झाला. सुरुवातीला उपाययोजना म्हणून पटेल यांनी स्थानिक पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान,अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी, मोठ्या प्रमाणावर लाकूड तसेच प्लास्टिक जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्लायवूड दरवाजे, लाकडी साहित्य, मशनरी जळून खाक झाली आहे. तसेच ही आग नेमकी लागली कशामुळे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी पुसेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात

Shahu Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; म्हणाले, 'सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

AI Stethoscope : हा तर नवा चमत्कार! संशोधकांनी बनवले AI स्टेथोस्कोप; 15 सेकंदात देणार हृदयाच्या घातक समस्यांची अचूक माहिती

Maratha Reservation : 'शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा आणि आझाद मैदानातच..'; जरांगेंची मराठा आंदोलकांना महत्त्वाची सूचना

'ओबीसींवर अन्याय झाला, तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत उतरू'; छगन भुजबळांचा इशारा, मराठा आरक्षणावरून वाद पेटणार?

SCROLL FOR NEXT