सातारा

कऱ्हाड पालिकेची सभा रखडली; आघाड्यांतील विसंवादाचा परिणाम, कामे पडणार लांबणीवर

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेची मासिक सभा झाली, की मुळात त्या सभेतील ठरावांच्या मंजुरीला विलंब होण्याचा प्रकार पालिकेत गाजणारा विषय आहे. त्यातच पालिकेची मासिक सर्वसाधरण सभा आता लांबणीवर पडते आहे. त्याला पालिकेतील आघाड्यांमधील विसंवाद कारणीभूत आहे. आघाड्यांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर येण्यास वेळ नाही. नेते पालिकेत येतच नसल्याने मोठे कठीण झाले आहे. त्यामुळे मासिक बैठकीत कोणते विषय घ्यायचे, त्याच्या सूचना काय असल्या पाहिजेत, ते पाहून सभा कॉल करण्यासाठी मुहूर्त अधिकाऱ्यांना मिळेना, अशी स्थिती आहे. त्याचा परिणाम शहरातील कामांवर होत आहे. 

नगरसेवकांतील विसंवाद व ठरावांवरील प्रशासकीय मंजुरी, त्यानंतरची निविदा प्रक्रिया अशा सगळ्याच पातळ्यांवर यंदा पालिका पिछाडीवर आहे. त्याला सभा होत नसल्याचे एकमेव कारण आहे. मागील मासिक सर्वसाधारण सभा केव्हा झाली, त्याची तारीख नगरसेवकांनाही सध्या आठवत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्या बैठकीत ठराव, तसेच पडून कामे खोळंबली जात आहेत. त्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. पालिका अधिकाऱ्यांनी एखादे काम सुरू केले, की त्याची माहिती न दिल्याने नगरसेवकांसोबत त्यांचे शाब्दिक खटके उडताना दिसत आहे. आघाड्यांच्या विसंवादामुळे रखडणाऱ्या सभेबद्दल कोणताच नगरसेवक स्पष्टपणे बोलत नाही.

पालिकेत सध्या जनशक्ती आघाडी आहे. तिची दोन शकले झाली आहेत. जनशक्तीचे उपाध्यक्ष जयवंत पाटील यांचा एक गट स्वतंत्रपणे कारभार करतो आहे. जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव यांचा गट स्वतंत्रपणे काम करत आहे. श्री. यादव क्वचित पालिकेत येतात. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी त्यांची वाट पाहवी लागते. पालिकेत भाजपच्या चार नगरसेवकांचाही गट आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचा जास्त सलोखा नाही. त्यामुळे तेथेही सार काही अलबेल दिसते आहे. पालिकेत विरोधी म्हणावा असा लोकशाही आघाडीचा गट आहे. मात्र, तेही सभेबद्दल जास्त प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. लोकशाही आघाडीने मासिक सभा घ्यावी, अशी लेखी मागणी केली आहे. मात्र, ते अधिक बोलण्याचे टाळताना दिसतात. या सगळ्या विसंवादाचा परिणाम विकासकामांवर होत आहे. त्यामुळे पालिकेतील सावळा गोंधळाचा परिणाम थेट स्वच्छ सर्वेक्षणावर झाला आहे. 

सप्टेंबरनंतर सभाच नाही 

यापूर्वीची पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा 21 सप्टेंबर 2020 रोजी झाली होती. त्यानंतर पालिकेत मासिक सर्वसाधारण सभा झालेली नाही. त्यानंतर विशेष सभा झाली, तीही एकमेव 11 डिसेंबरला झाली होती. त्यानंतर सभाच नाही, अशी स्थिती आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT