Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

जिहे-कटापूरसह शिवकालीन तळ्यांच्या जीर्णोध्दारासाठी भरघोस निधी देणार; केंद्रीय मंत्र्यांचे उदयनराजेंना आश्वासन

Balkrishna Madhale

सातारा : माण-खटाव तालुक्याच्या विकासात भर घालणाऱ्या जिहे-कटापूर या महत्त्वकांक्षी योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नुकताच ५३७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाकडून आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Minister Gajendrasinh Shekhawat) यांनी दिले असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी दिली. दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी उदयनराजेंनी भेट देवून या मागणीचे निवेदनही शेखावत यांना दिले. 

माण-खटाव तालुक्याच्या विकासात भर घालणारे लक्ष्मणराव इनामदार अर्थात जिहे-कटापूर या महत्त्वकांक्षी योजनेस केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. जिहे-कटापूर या योजनेमुळे २७५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या योजनेमुळे माण-खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे ६७ गावांमधील सुमारे २७५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या परिसरातील दुष्काळ निवारणास उपयुक्त ठरणार आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पासाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, काही प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्रातून जास्तीत -जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

दरम्यान, शिवकालीन तळ्यांचा पुनर्विकास करण्याबाबत केंद्रीयमंत्री शेखावत यांच्याशी चर्चा केली. सातारा जिल्ह्यात सुमारे २० गड किल्ले असून यातल्या अनेक गड किल्ल्यांवर शिवकालीन तळी अस्तित्वात आहेत. या शिवकालीन तळ्याचा जीर्णोध्दार करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी चर्चा केल्याचे उदयनराजेंनी सांगितले. यावेळी बोलताना शेखावत यांनी, या सर्व किल्ल्यांवरील जलस्रोतांचा अभ्यास करून त्यासंदर्भात कोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देता येईल, याबाबत प्रशासकीय पातळीवर माहिती घेवून विशेष निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. 

गड किल्ल्यांवरील जलस्त्रोत मजबूत करण्यासाठी किल्ल्यांवरील शिवकालीन तळ्यांचा विकास कसा करायचा?, तसेच ही तळी नेमकी कशी स्वच्छ करायची याबाबतचा अहवाल शासनामार्फत मागविण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पावर ती कोणत्या माध्यमातून निधी देता येईल याचीही पाहणी केली जाईल, असेही शेखावत यांनी सांगितले. या भेटीदरम्यान कृष्णानदीच्या शुद्धीकरणाबाबतही शेखावत यांच्याशी चर्चा करण्यात आली. कृष्णा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी प्रदूषण मुक्त करण्यासंदर्भात नेमकी काय उपाययोजना करता येईल. याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून काही उपाययोजना करता येईल का? याबाबत शेखावत यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा, ठरलेल्या वेळेनुसार होणार निवडणूक; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

विश्वविजेता भारतीय संघ ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य संघाला भिडणार; वर्ल्ड कपची तयारी, पण स्मृती मानधना नाही खेळणार?

Processed Food Side Effects: तुम्ही पदार्थ खाता की पदार्थ तुम्हाला खातो? प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे स्थूलता,मधुमेह, हृदयरोगाचा धोका

Mumbai News: सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला एसी लोकलचा बनावट पास, कसे आले प्रकरण उघडकीस?

Medha Politics: टीका करणारे निवडणुकीनंतर गायब होतील: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; मुंबईतून येणाऱ्याच्या अंगात येत, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT