Satara Latest Marathi News 
सातारा

मंद्रुळकोळेत आगीत सहा जनावरे होरपळली; दोन शेडसह गंजी जळून खाक

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : विभागातील निगडे व कदमआवाड (मंद्रुळकोळे, ता. पाटण) येथे जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीत सहा जनावरे होरपळून जखमी झाली. निगडेत शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास तर कदम आवाडात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आगीची घटना घडली. आगीत शेडसह चारा व अन्य साहित्य जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

काल दुपारी अडीचच्या सुमारास निगडेतील पवनचक्कीच्या वीजवाहिन्या वाऱ्यामुळे एकमेकांना चिटकल्याने खाली वाळलेल्या गवतात ठिणग्या पडल्या आणि क्षणात आगीचा भडका उडाला. तेथील महादेव बाळकू तेटमे यांच्या घराच्या दिशेने आग निघाल्याने ग्रामस्थ व तेटमे कुटुंबांनी प्रसंगावधान राखून आग रोखली. मात्र, वाऱ्यामुळे जवळच असलेल्या त्यांच्या जनावरांच्या शेडकडे आग पसरली आणि वाळलेल्या चाऱ्यामुळे संपूर्ण शेड आगीत सापडले. ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करून शेडमध्ये बांधलेल्या बैल, म्हैस व रेड्याच्या गळ्यातील दोर कापले; परंतु तोपर्यंत तिन्ही जनावरे गंभीररीत्या भाजली होती. आग लागताच शेडमधील एक रेडकू बाहेर पळाल्याने सुदैवाने बचावल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

ढेबेवाडी-सणबूर रस्त्यालगत असलेल्या कदम आवाड (मंद्रुळकोळे) येथे आनंदराव शंकर कदम यांच्या जनावरांच्या शेडला आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. शेडजवळच्या गवत व कडब्याच्या गंजीनी पेट घेतल्याने क्षणात आग डोंब उसळला. घटनास्थळी धावलेल्या ग्रामस्थांनी पेटत्या शेडमध्ये घुसून आत अडकलेल्या दोन म्हशी व रेडकाची सुटका केली. मात्र, तिन्ही जनावरे भाजल्याने जखमी झाली आहेत. जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पाण्याचा टॅंकर पाठवला. आग नियंत्रणात आणण्यात यश आल्यामुळे सुदैवाने आजूबाजूची घरे बचावली. आगीत शेडमधील बॅरल, घागरी व अन्य साहित्य जळून खाक झाले. आजूबाजूची झाडेही आगीत होरपळली आहेत. मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार तलाठी संजय काशीद, महसूल कर्मचारी सोमनाथ पाटील यांनी पंचनामा केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT