Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

एकीकडे उकिरडा अन्‌ दुसरीकडे तळे; ढेबेवाडीत रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थ्यांची कसरत

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : एका बाजूला तुंबलेल्या गटारातील पाण्याचे रस्त्यावर साचलेले तळे तर दुसरीकडे ग्रामपंचायतीने गावातील कचरा टाकण्यासाठी तयार केलेला उकिरडा आणि त्यातूनच वाट शोधत निघालेले विद्यार्थी-रुग्ण व नागरिक अशी विचित्र कसरत येथील ग्रामीण रुग्णालयासमोरून बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर बघायला मिळत आहे. ग्रामपंचायत त्यावर काही ईलाज शोधणार की नाही, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या समोरून बाजारपेठेत गेलेल्या रस्त्याच्या परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळा असून विद्यार्थी-रुग्ण व नागरिकांची तेथून सतत वर्दळ बघायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून येथे कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या समस्येने डोके वर काढले आहे. कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या कंपाउंडजवळ रस्त्याकडेला मोठा खड्डा खोदून त्यांनी उकिरडा तयार केला आहे. 

त्यातून वारंवार ओसंडणारा कचरा हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो. अलीकडे तर एका बाजूला हा उकिरडा आणि दुसऱ्या बाजूस तुंबलेल्या गटारामुळे रस्त्यावर साचलेले दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे यामुळे विद्यार्थी, नागरिक व रुग्णांची ये-जा करताना कसरत होत आहे. साचलेल्या पाण्यातून वाहने ये-जा करताना अंगावर चिखलयुक्त पाणी उडून वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. ग्रामपंचायत त्यावर काही ठोस ईलाज शोधणार की नाही, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

बाजारपेठेतील हा प्रमुख रस्ता असल्याने सतत पादचारी व वाहनांची वर्दळ असते. तेथे वारंवार उद्‌भवणाऱ्या या समस्येवर ग्रामपंचायतीने तातडीने ठोस उपाय शोधायलाच हवा. 

-आण्णा कारंडे, ग्रामस्थ 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT