मलकापूर 
सातारा

आम्ही‍ केलेले निर्जंतुकीकरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि. सातारा) : मैल्याच्या टॅंकरद्वारे सॅनिटायझर फवारणी करत असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष सूरज शेवाळे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना उपाध्‍यक्ष मनोहर शिंदे यांनी याबाबतची सर्व माहिती आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे, असे स्‍पष्‍ट केले आहे. 

ते म्‍हणाले, कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच पालिकेने योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव शहरात झाला नव्हता. तथापि, 21 एप्रिल 2020 रोजी प्रभाग पाचमध्ये पहिला बाधित आढळल्यावर त्यापाठोपाठ प्रभाग पाच, आठ व नंतर तीन व नऊमध्येही बाधित व्यक्‍ती आढळल्या.

पालिकेने उपलब्ध साधन सामग्रीद्वारे सोडियम हायड्रॉक्‍सिक्‍लोराईडची फवारणी सुरू ठेवली. प्रादुर्भावावर नियंत्रण राहावे म्हणून सर्व नगरसेवक, स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांमार्फत पालिकेने शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून, भिलवाडा पॅटर्ननुसार जीवनावश्‍यक वस्तूंचाही पुरवठा केला. गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप केले. नागरिकांची आरोग्य तपासणी थर्मल स्कॅनर मीटर व ऑक्‍सिपल्स मीटरद्वारे केली होती. कोरोनाबाबतची भीती असूनही कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष फिरून औषध फवारणी केली होती. 
सुरुवातीला पालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीद्वारे काम सुरू ठेवले होते; परंतु वाढता प्रादुर्भाव पाहून व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी विचारात घेता वाहनाद्वारे औषध फवारणी करणे योग्य असल्याने शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंट कऱ्हाड, संविधा मेंटनन्स आगाशिवनगर, कृष्णार्जून शेती फार्म, नावडी यांच्याकडे असणाऱ्या वाहनांद्वारे शहरातील रस्ते, गटार, गल्ली, बोळांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

वेळप्रसंगी संपूर्ण शहरात एकाच वेळी फवारणी करण्याच्या उद्देशाने आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडे डॉल्फीन एजन्सीच्या भाडेतत्त्वावर कार्यरत असणाऱ्या उच्च क्षमतेच्या वाहनावर यंत्रणा बसवून औषध फवारणी झाली. त्यापूर्वी त्या वाहनाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्जंतुकीकरण केले गेले. यामागे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीला प्राथमिकता देण्यात आली. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश आले व शहर कोरोनामुक्त झाले. तथापि, शहरातील काही नागरिकांनी केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांमध्ये पालिकेविषयी गैरसमज व संभ्रम निर्माण व्हावा, याकरिता वर्तमानपत्रामध्ये औषध फवारणीसाठी वापरलेल्या वाहनाबाबत बातमी प्रसिद्धीस दिली; परंतु सर्व सुज्ञ नागरिकांना पालिका आरोग्याबाबत घेत असलेल्या उपाययोजनांची माहिती आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. याबाबतची सर्व माहिती आरोग्य विभागाकडे उपलब्ध असून, याकरिता आरोग्य विभागप्रमुख रमेश बागल व शहर समन्वयक पुंडलिक ढगे यांच्याशी संपर्क साधावा. 

ई निविदेद्वारे वाहनाची तरतूद 
आरोप झालेले वाहन पालिकेने भाडे तत्त्वावर सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने 2019 मध्ये घेतलेले आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळामध्ये सदरचे वाहन घेण्यात आलेली आहे ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. सदरचे वाहन भाडेतत्त्वावर घेण्याबाबत ई-निविदा प्रसिद्ध करून कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच घेण्यात आलेले आहे. यासंदर्भातील सर्व माहितीही उपलब्ध होऊ शकते, तरी अपुऱ्या व चुकीच्या माहितीद्वारे नागरिकांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Suraj Wife: ही आहे सुरज चव्हाणची होणारी बायको! अंकिताने खास पद्धतीने दोघांचं केलं केळवण, सुरजचा उखाणा एकदा ऐका! Viral Video

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

SCROLL FOR NEXT