Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

शिवसैनिकांची अभेद्य फळी आणखी मजबूत करणार; बनपुरीत शेलारांची ग्वाही

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : शिवसेनेची विचारधारा खोलवर रुजलेल्या सातारा जिल्ह्यात शिवसैनिकांची अभेद्य फळी आणखी मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे. विकासाच्या गतिमान प्रवाहातून एकही गाव आणि वाडीवस्ती वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार यांनी केले. 

बनपुरी (ता. पाटण) येथे शिवसेनेच्या तीन शाखांचे उद्‌घाटन श्री. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. भाजपमधून शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले बनपुरीतील युवानेते कमलाकर पाटील यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. श्री. शेलार म्हणाले,""गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पाटण तालुक्‍याचा चौफेर विकास सुरू आहे. त्यांचे हात बळकट करून प्रत्येकाने विकासपर्वाचे साक्षीदार बनावे. बनपुरीतील कमलाकर पाटील यांच्या पक्षप्रवेशाने नवचैतन्य निर्माण झाले आहे.'' 

जगन्नाथ सुर्वे (ज्योतिर्लिंग वॉर्ड), आनंदा भालेकर (हनुमान वॉर्ड), विश्रांत कडव (पेठ वॉर्ड) यांची शाखाप्रमुख म्हणून निवड जाहीर करण्यात आली. माजी तालुकाध्यक्ष श्री. चाळके, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक विकास गिरीगोसावी, दादासाहेब देसाई, विभागप्रमुख विक्रम जगदाळे आदींसह शिवसैनिक, देसाई गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. अशोकराव पाटील, दादासाहेब सुर्वे यांची भाषणे झाली. अमित पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र हणबर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मनोज पाटील, सतीश देसाई, कृष्णा मराठे, प्रमोद पाटील, भास्कर पाटील, दीपक देसाई, शेखर देसाई, वैभव देसाई, नंदू पाटील, अतुल पाटील, राजकुमार देसाई आदींनी परिश्रम घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''हे दोन प्रश्न विचारले म्हणून जरांगे मला संपवायला निघालेत'', धनंजय मुंडेंकडून समोरासमोर चर्चा करण्याचं आवाहन

Mosque Blast : 'जुमे की नमाज' सुरू असतानाच मशिदीत भीषण स्फोट; ५० पेक्षा अधिकजण जखमी

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Stray Dogs Case: महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर भटके श्वान आणि प्राण्यांना प्रवेशबंदी! सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT