Satara Latest Marathi News 
सातारा

शिवेंद्रसिंहराजेंसोबत माझे कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही एकत्रच : शशीकांत शिंदे

उमेश बांबरे

सातारा : मी सातारा-जावळीतून लढावे, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मागील निवडणुकीत सांगितले होते. पण, आता मी श्री. पवार यांच्या सांगण्यावरून जिल्ह्यात राष्ट्रवादीची पक्ष, संघटना बांधणीचे काम करत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी आजपर्यंत कधीही टाळलेली नाही. मी कोरेगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे आमदार आमदार शशीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले

राष्ट्रवादीच्या जनता दरबारानंतर आमदार शिंदेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सगळे पक्ष एकत्र येऊन राजकारण विरहित निवडणूक होऊन जिल्हा बॅंक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथे पक्ष बाजूला ठेऊन आम्ही सर्वजण काम करणार आहोत. यावेळेस शंभूराज देसाईंना संधी मिळणार का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, आघाडीतील नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. आघाडीच्या घटक पक्षात भाजप असणार का, यावर ते म्हणाले, जिल्हा बॅंकेसाठीच्या आघाडीत सर्व पक्ष बाजूला ठेऊन आम्ही एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करणार आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

जिल्हा बॅंकेची निवडणूक पक्षविरहित होणार असून महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत निर्णय घेणार आहोत, तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंसोबत माझे वैयक्तिक कोणतेही भांडण नाही, आमचे भांडण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी असेल. यावेळेस आम्ही पालिकेत स्वतंत्र्य पॅनेल टाकणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा पालिकेत मी आणि दीपक पवार पॅनेलचे नेतृत्व करू, शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल असेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 

शिंदे पुढे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेंसोबत कोणतेही वैचारिक मतभेद नाही. आजही आम्ही एकत्र काम करत आहोत. आमचे भांडण जिल्हा परिषद, पंचायत समिती व सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असणार आहे. सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र पॅनेल टाकणार आहे. दीपक पवार म्हणतात की, आमदार शिंदेंचा जावळीशी काहीही संबंध नाही ते कोरेगावचे आहेत.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रश्‍नावर आमदार शिंदे म्हणाले, दीपक पवार हे आमच्या पक्षातील सहकारी आहे. जावळी साताऱ्यात लढताना मी त्यांना विचारावे अशी त्यांची भावना असेल. पण, मी दहा वर्षे जावळीचे नेतृत्व केलेले आहे. तेथील लोकांना बरोबर घेऊन मी काम केलेले आहे. त्यामुळे आमच्या दोघांचे एकच ध्येय असले पाहिजे. येथे आमच्या दोघांपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महत्वाचा आहे. त्यामुळे एकत्रित काम केल्यास ते पक्षाच्या फायद्याचे ठरणार आहे. मी शरद पवारांचा पाईक आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणार आहे. मुंबईत काम करताना गणेश नाईकांशी चांगले संबंध होते. पण, पक्ष आला की आम्ही विरोधात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचा माझ्यावर विश्‍वास आहे, त्यामुळे माझ्याबद्दल कोण काय करतंय याकडे मी लक्ष देत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT