Satara Latest Marathi News 
सातारा

प्रत्येक गावांत राष्ट्रवादीसह शरद पवारांचे नेतृत्व बळकट करा; शिंदेंचे राज्यातील सरपंचांना आवाहन

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : गावागावांतील लोकांशी जिव्हाळ्याचे नाते आणि प्रगतीची चांगली परंपरा निर्माण झाल्याने वाई तालुक्‍यात 76 पैकी जवळपास 69 ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले. 

राऊतवाडी (ता. वाई) येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार श्री. शिंदे, जिल्हा परिषद माजी सदस्य दिलीप बाबर, सुधीर भोसले, मोहन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आगामी किसन वीर सातारा साखर कारखाना, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहून आमदार पाटील यांचे नेतृत्व बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

दिलीप बाबर म्हणाले, ""राऊतवाडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ दिली असून, यापुढे विकासामुळे गावाचे चित्र पालटले. अन्य कोणालाही गावात थारा देऊ नका.'' या वेळी युवा कार्यकर्ते सुधीर भोसले, संतोष बाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. नूतन सरपंच शशिकांत घाडगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात उपसरपंच तनुजा गायकवाड, सदस्या प्रियांका घाडगे, रोहिणी मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. 

अरविंद गायकवाड, राजेंद्र गायकवाड, राहुल घाडगे, मोहन साळुंखे, शंकर घाडगे, संदीप घाडगे, एकनाथ घाडगे, विकास घाडगे, सर्जेराव घाडगे, पोपट सुर्वे, आबाजी घाडगे, दीपक घाडगे, संतोष घाडगे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुधीर गायकवाड, विजय बाबर, नितीन निकम, नंदकुमार माने, मनोज गाढवे, रियाज इनामदार, रवींद्र जाधव, संतोष ढाणे, अंकुश जगताप, प्रकाश अंबवले, सुरेश साळुंखे, ज्ञानेश्वर महामुनी, अनिल माने, बबन जगताप, शशिकांत माने, मोरेश्वर काशीद उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

SCROLL FOR NEXT