Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

कऱ्हाडला 81, तर पाटणला 75 टक्के मतदान; सोमवारी होणार निकालाचे चित्र स्पष्ट

हेमंत पवार, जालिंदर सत्रे

कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्‍यातील ग्रामपंचायतींसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. 87 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 81 टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. 

सायंकाळी साडेपाचला मतदान संपल्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदार उपस्थित होते. त्यांचेही मतदान करून घेण्यात आले. मतदानादरम्यान पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. तालुक्‍यात 87 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान झाले. सैदापूर येथील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सर्वात कमी 51 टक्के, तर सर्वात जास्त शिंदेवाडी-विंगच्या तीन नंबर वॉर्डमध्ये 98 टक्के मतदान झाले. येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीची प्रक्रिया सोमवारी (ता. 18) होणार आहे. त्यासाठीची कार्यवाही तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे. 

पाटण : तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल चुरशीने मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. सरासरी 75.56 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दिली. 107 ग्रामपंचायतींपैकी 18 बिनविरोध, तर 17 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. 72 ग्रामपंचायतींमधील 391 जागेसाठी 775 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉल येथे मतमोजणी होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घेणं ही आयोगाची करप्ट प्रॅक्टीस - उद्धव ठाकरे

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT