सातारा

बीएसएनएल, टपाल कार्यालयाने कामकाजात सुधारणा करावी; पुसेगावात सेना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

पुसेगाव,(जि.सातारा) : गेली तीन महिने पुसेगाव टपाल कार्यालयाचे कामकाज बंद पडले असून, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. सतत हेलपाटे घालूनही अडचणीच्या काळात ठेवीचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याबाबत इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी मिळत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत असल्याबद्दल शिवसेना आक्रमक झाली. दोन दिवसांत आर्थिक व्यवहार सुरू न झाल्यास टपाल कार्यालय रस्त्यावर आणण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे.
 
ठेवीदारांसह श्री. जाधव यांनी टपाल कार्यालयात जाऊन पोस्टमास्तर यांच्याशी चर्चा केली. श्री. जाधव यांनी सांगितले, की कोरोनामुळे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. लॉकडाउन व संचारबंदीमुळे लोकांजवळचे पैसे सपले आहेत. शेतीत मशागतीची कामे सुरू असून, टपाल कार्यालयाचे कामकाज गेले तीन महिने पूर्णपणे बंद आहे. सर्व पत्रव्यवहार व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरिबांनी रोजंदारीतून मिळणारे थोडेथोडे पैसे ठेवीच्या रूपाने पोस्टात ठेवले आहेत. पण, आता अडचणीच्या वेळेलाच हेलपाटे मारूनही पैसे मिळत नसल्याने लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या सोबत या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बीएसएनएलकडून कनेक्‍टिव्हिटी मिळत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. ही बाब आपण आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे. कनेक्‍टिव्हिटी सुरू करणे हे आपल्या अखत्यारित नाही, अशी उत्तरे पोस्टमास्तर गोरे यांनी दिल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले. या वेळी श्री. जाधव यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. बीएसएनएलचे कार्यालय ज्या जागेत आहे, त्या जागेची भाडेपट्टा रक्‍कम थकीत असल्याने जागा मालकाने त्या कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे बीएसएनएल कार्यालय बंद आहे.
 
दरम्यान, गावातील बॅंका व अन्य संस्थांची कनेक्‍टिव्हिटी सुरू असताना पोस्टाचीच कनेक्‍टिव्हिटी बंद का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पोस्टमास्तर गोरे यांनी सांगितले, मार्च महिन्यामध्ये पोस्टाचे मोडेम बिघडल्यामुळे नवीन बसविले. पोस्टाचे नवीन मोडेम जोडण्यासाठी बीएसएनएलचा ऑपरेटर कार्यालयात जाण्यापूर्वीच जागेचे भाडे थकविल्याच्या कारणावरून जागामालकाने कार्यालयाला टाळे लावले. त्यामुळे अद्याप कनेक्‍टिव्हिटी होऊ शकली नाही. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुसेगाव पोस्टातील ठेवीदारांना पैसे काढण्याची सोय खटाव येथे केली आहे.
 
बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच पोस्ट खात्याच्या वरिष्ठांनी लोकांच्या अडचणींची जाणीव ठेऊन पुसेगाव पोस्ट कार्यालयातील आर्थिक व अन्य व्यवहार दोन दिवसांत सुरू करण्याबाबत पावले न उचलल्यास कार्यालय रस्त्यावर आणण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

कोविड : साताऱ्यात रात्रीत १९ रूग्ण वाढले, वडगांवच्या एकाचा मृत्यू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT