Koyna Dam esakal
सातारा

Satara Rain Update : कोयना धरण क्षेत्रात धुवांधार; महाबळेश्वरलाही पावसानं झोडपलं

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूय.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूय.

Satara Rain Update : कोल्हापूर (Kolhapur), सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूय. कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला मुसळधार पावसानं मंगळवारी रात्रीही झोडपून काढलंय. गेल्या 15 तासांत कोयनानगर इथं १३६ मिलीमीटर, नवजा १२० मिलीमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) उच्चांकी १४० मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

धरणाच्या पाणीसाठ्यात १५ तासांत ३.६३ टीएमसीनं भर पडली असून धरणाचा एकूण पाणीसाठा ७९.११ टीएमसी झाला आहे. मुसळधार पावसामुळं जलाशयात प्रति सेकंद ७० हजार १५ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेता अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. कालपर्यंत 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असताना आता 1 लाख 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुय. कोयना धरणाचे कधीही दरवाजे उघडले जाऊ शकतात. कोयना धरणात सध्या 80 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. कोयना आणि महाबळेश्वर परिसरात पावसाची संततधार कायम आहे.

राधानगरी धरण 100 टक्के भरले

राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसानं थैमान घातलं आहे. परिणामी, राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होऊ लागली असून धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास गेट क्रमांक ६ उघडले असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरूय. यामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीची वाटचाल धोका पातळीकडं होऊ लागली आहे.

महाबळेश्वरात 140 मिलीमीटर पावसाची नोंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे सर्वाधिक 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे 115 मिलीमीटर आणि कोयनानगर येथे 92 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 17,052 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 68.89 टीएमसी तर पाणीपातळी 2128 फूट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT