rte sakal media
सातारा

सातारा : ‘आरटीई’ कागदावर, पोरं मोलमजुरीवर..!

खटाव तालुक्यातील परिस्थिती; पाटी-पेन्सिलऐवजी हाती खोरे अन्‌ टिकाव

ऋषिकेश पवार

विसापूर : खटाव तालुक्यातील(khatav) पुसेगाव येथील फक्त तीन वीटभट्ट्यांवर ३० ते ३५ मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात असणाऱ्या वीटभट्ट्यांवर जाऊन शिक्षण विभाग अथवा संबंधित यंत्रणांनी शाळाबाह्य मुले किती आहेत, याचे सर्वेक्षण केले तर शेकडो मुले सापडतील. एका बाजूला ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) असला तरी तो खटाव तालुक्यात मात्र ‘आरटीई कागदावर अन्‌ पोरं मोलमजुरीवर..!,’ अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पाटी-पेन्सिल हाती घेण्याच्या वयात मुलांच्या हाती खोरे अन्‌ टिकाव आले आहे.

राज्याच्या विविध भागांतून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण पाठीवर बिऱ्हाड घेऊनच खटाव तालुक्यातील वीटभट्टीवर कामासाठी येतात. एका बाजूला मजुरी तर दुसरीकडे कुटुंब आणि त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी असते. सोबतच गांजलेली आर्थिक परिस्थिती असते. त्यामुळे ते आपल्या मुलांना वीटभट्टीवरच घेऊन येतात आणि बाजूलाच कुठेतरी संसार मांडतात. परिणामी त्यांच्या मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात आणि ती येथे मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळांमध्ये दाखल करणे अथवा जिथे शक्य आहे, तिथे साखरशाळेच्या धर्तीवर ‘वीटभट्टी शाळा’ सुरू करणे आवश्यक आहे.

पुसेगाव येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काटेवाडी येथील सर्वोदय सामाजिक संस्थेने बिनभिंतीची शाळा सुरू केली होती. संस्थेचे अध्यक्ष जीवन इंगळे यांनी स्वतः वीटभट्टी वर जाऊन तेथील शाळाबाह्य मुलांची माहिती घेतली आणि ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून वीटभट्टी परिसरातच शिक्षण देणे सुरू केले. मात्र, ही बाब लक्षात येताच संबंधित विभागाने तत्परता दाखवत या विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेतली आणि या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्याचे आवाहन केले. शिक्षण विभागाला जाग येऊन या तीन वीटभट्ट्यांवरील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तात्पुरता मिटला असला तरी तालुक्यातील इतर ठिकाणच्या शाळाबाह्य मुलांचे काय? या प्रश्नावर बोलण्यास कुणीही तयार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT