सातारा

मदन भोसलेंच्या घरासमोर 'स्वाभिमानी' चा ठिय्या

उमेश बांबरे

सातारा : किसर वीर कारखान्याच्या थकीत ऊसबिल वसुलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर नुकतेच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनभाऊ साळुंखे, तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल बरं?
 
यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले, की किसन वीर कारखान्याच्या व्यवस्थापनाने 30 ऑगस्टपर्यंत उसाचे उर्वरित बिल देणार असल्याचे संघटनेला लेखी दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत थकीत ऊसबिल न दिल्याने लेखी दिलेली मुदत संपली आहे.

सत्तेत नसतानाही करुन दाखवलं, आता पुढची रणनीतीही ठरली : शिवेंद्रसिंहराजे

शेतकऱ्यांचे जवळपास 35 कोटी रक्कम कारखान्याकडे थकीत आहे. सहा ते सात महिने झाले, तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या घराच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात संघटनेचे तीनच पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

भारीच! उंडाळे पंचायत रुग्णांना देणार मोफत ऑक्‍सिजन

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT