सातारा

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : टोमॅटोला मिळू लागला चांगला दर

रूपेश कदम

दहिवडी (जि.सातारा) : कोरोनाच्या सोबतीने आलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेली पिके अक्षरश: फेकून द्यावी लागली. मात्र, कांद्यासोबतच महत्त्वाचे असलेले टोमॅटो हे नगदी पीक शेतकऱ्यांना तारण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांबरोबर शेती क्षेत्रालाही त्याची झळ पोचली. वाहतूक बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा माल जाग्यावरच सडला. विशेषतः कांदा, कलिंगड, डाळिंब, टोमॅटो यांची लाली दर पडल्यामुळे फिकी पडली. कलिंगड, टोमॅटो हे शेतकऱ्यांनी फेकून दिली. आहे त्या अवस्थेत या फळपिकांच्या बागा शेतकऱ्यांनी सोडून दिल्या. मात्र, मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला 50 रुपयांना असणारे कॅरेट शंभर, दीडशे करत दोनशे रुपयांपर्यंत पोचले आहे. आवक वाढल्यामुळे दरात चढ-उतार होण्याची शक्‍यता आहे. मात्र, दर कॅरेटला शंभरच्या पुढे दर राहिला तर शेतकऱ्यांचा भांडवली खर्च निघू शकतो. दोनशेच्या पुढे दर मिळाल्यास बरा पैसा मिळू शकतो. निसर्गाने साथ दिल्यास कॅरेटला पाचशेपर्यंतही दर जाऊ शकतो, अशी शक्‍यता आहे. लागणीपासून 70 दिवसांनंतर फड सुरू होऊन तो नंतर दीड ते पावणेदोन महिने चालतो. चांगले उत्पादन निघाले तर एका एकरात 1800 ते 2000 कॅरेट उत्पन्न निघू शकते. त्यामुळे सर्व खर्च जाऊन 200 रुपये कॅरेटला मिळाले तर शेतकऱ्यांना परवडते. 


दराची चिंता न करता मी दरवर्षी टोमॅटो लावतो. चांगले उत्पादन काढण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. त्यामुळे दर मिळाला तर बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. यंदा चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. 
 - कैलास मगर, प्रगतशील शेतकरी, मलवडी 

मलवडी परिसरात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. येथून सोलापूर, कोल्हापूरसह पुणे, मुंबई व परराज्यांतही टोमॅटो विक्रीस जातो. सुरवातीला टोमॅटोला दर नव्हता. पण, काही काळ दर वाढून पुन्हा तो खाली आला आहे. पुढील काळात दर वाढण्याची शक्‍यता आहे. 
- अनिल हराळे, व्यापारी व वाहतूकदार 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT