karad 
सातारा

केंब्रीज विद्यापीठाने केला "या' युवकाचा गौरव

सकाळ वृत्तसेवा

सातारा (जि. सातारा) : कृष्णानगर (सातारा) येथील प्रा. सौरभ देविदास कुलकर्णी यांना भारत सरकारच्या मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची (निटी) डॉक्‍टरल फेलोशिप (पीएच.डी.) प्रदान करण्यात आली. या अभ्यासाबद्दल केंब्रीज विद्यापीठानेही या युवकाला गौरवले आहे. 

प्रा. सौरभ यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय "दि डायनॅमिक्‍स ऑफ मॅन्युफॅक्‍चरिंग स्ट्रॅटेजी' हा होता. भारतीय उत्पादन क्षेत्राच्या उत्पादकता आणि उत्पादन क्षमता वाढीसाठी हे संशोधन विशेष साहाय्यभूत ठरणार आहे. भारत सरकारच्या "मेक इन इंडिया', "आत्मनिर्भर भारत' यासारख्या योजनांमधील उत्पादनवाढीच्या प्रयत्नांमध्ये हे संशोधन उपयोगी पडणार आहे. प्रा. सौरभ यांचे शोधनिबंध हे जगातील सर्वोत्तम नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून, या अभ्यासाचे उत्पादन तज्ज्ञांकडून विशेष कौतुक होत आहे. या शोध अभ्यासासाठी केंब्रीज विद्यापीठाने प्रा. सौरभ यांना नुकतेच गौरविले आहे. या उल्लेखनीय संशोधनामध्ये "निटी'तील प्रा. डॉ. प्रियंका वर्मा, प्रा. डॉ. मुकुंदन राघवन, प्रा. डॉ. विवेक खानझोडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. 

प्रा. सौरभ यांच्या यशात आणि संशोधनात रिझर्व्ह बॅंकेचे मानद संचालक व ज्येष्ठ पत्रकार, सी. ए., अर्थतज्ज्ञ, एस. गुरुमूर्ती, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ पेरेझ चंद्र, श्रीपाद हळबे आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रा. सौरभ यांचे अभियांत्रिकी शिक्षण केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सातारा) व विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग (पुणे) येथे झाले आहे. या विषयातील पुढील संशोधन आणि अध्यापनासाठी सध्या ते नवी दिल्लीतील फाउंडेशन ऑफ ऑर्गनायझेशन रिसर्च ऍण्ड एज्युकेशनमध्ये प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. सातारा परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून प्रा. सौरभ यांचे अभिनंदन होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT