Koregaon NCP Shashikant Shinde esakal
सातारा

Politics : खुद्द शरद पवारांनीच सांगितलंय राष्ट्रवादीचा कोणताही नेता भाजपात..; NCP च्या बड्या नेत्याचा दावा

शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के अपात्र होणार आणि त्यामुळं सरकार बरखास्त होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

'लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्यात दम असेल तर लगेच निवडणुका जाहीर करा; पण ते करू शकत नाहीत.'

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) कोणीही कुठं जाणार नाही, तसंच कोणीही फुटणार नाही, असं खुद्द शरद पवारांनी सांगितलंय. त्यामुळं राष्ट्रवादीतील कोणीही भाजपमध्ये जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के अपात्र होणार आणि त्यामुळं सरकार बरखास्त होणार आहे, असा दावाही त्यांनी केला. आमदार शिंदेंनी (Shashikant Shinde) आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला.

शिंदे म्हणाले, ‘‘शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टपणे सांगितले, की राष्ट्रवादीतील कोणीही फुटणार नाही. शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के अपात्र होणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होणार आहे. आता सरकार अस्थिर होणार असल्याने हे येणार ते येणार अशा वावड्या उठत असतात. लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्यात दम असेल तर लगेच निवडणुका जाहीर करा; पण ते करू शकत नाहीत. कारण त्यांना विश्वास नाही.''

त्यांच्या दिल्लीतील यंत्रणेलाही त्यांचे दहा ते बाराच्यावर खासदार निवडून येणार नाहीत अशी माहिती मिळालेली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करायची तर सहा महिने आधी करावी लागते. लोकसभेची मुदत संपण्यास अजून एक वर्ष, तर विधानसभेला दीड वर्षे कालावधी आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

महेश शिंदेंनी दिलेल्या आसरानीच्या उपमेवर आमदार शिंदे म्हणाले, ‘‘एखाद्याला स्वतःची भीती वाटायला लागते. तेव्हा तो कलाकारांची नावे घेतो. त्यांच्या दृष्टीने मी आसरानी असलो तरी ते गब्बरसिंग आहेत. गब्बरसिंग गाव लुटायला यायचा हा तर जिल्हाच लुटायचा प्रयत्न करतोय. मस्ती आणि हुकूमशाही फार काळ चालत नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT