Sharad Pawar visit Satara esakal
सातारा

Satara NCP : अजित पवारांच्या बंडानंतर बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीत उभी फूट; 'या' आमदारांनी दिली दादांना साथ!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतही उभी फूट पडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

खासदार शरद पवार यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतही उभी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील, दीपक चव्हाण गेले आहेत.

तर आम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतच, अशी भूमिका खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे सातारा (Satara) बालेकिल्ला ‘दादा’ व ‘साहेब’ गटात विभागला गेला आहे.

याचे परिणाम आगामी निवडणुकांत पाहायला मिळणार आहे. आज राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड करीत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अचानक झालेल्या त्यांच्या शपथविधीने सर्वांना धक्का दिला.

सातारा जिल्हा हा खासदार शरद पवार यांना मानणारा जिल्हा असून, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मनाला जात आहे. १९९९ पासून हा बालेकिल्ला अबाधित आहे; पण अजित पवार यांच्या बंडानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्यासोबत फलटणचे राजे आणि विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि वाईचे आमदार मकरंद पाटील हे सहभागी झाले आहेत.

तर, खासदार शरद पवार यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता आगामी काळात जिल्ह्यातील आणखी कोण-कोण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणार, याची उत्सुकता आहे.

दरम्यान, आजचा (सोमवार) दिवस जाऊदेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील सर्वजण पुन्हा एकत्र शरद पवारांच्या सोबत पाहायला मिळतील, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगत आम्ही शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असे स्पष्ट केले, तर शरद पवार घेतील, त्या निर्णयासोबत आम्ही राहू, असे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

कार्यकर्त्यांशी चर्चा करू : मकरंद पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मंत्र्यांच्या शपथविधीची नावे राज्यपालांना कळविताना पहिल्या यादीमध्ये आमदार मकरंद पाटील यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून सुचवण्यात आले होते. मात्र, मकरंद पाटील यांनी ‘‘कार्यकर्त्यांशी व मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा केलेली नाही. लक्ष्मणराव पाटील यांच्यापासून आम्ही शरद पवार यांच्याजवळ आहोत. त्यामुळे आम्ही वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करू.’’

कोणी काहीही निर्णय घेवो, आम्ही मात्र शरद पवार यांच्यासोबत राहणार आहेत. ते ठरवतील ते धोरण व बांधतील ते तोरण हेच आमचे उद्दिष्ट आहे. राजकीय भूमिकेपेक्षा समाजकार्य महत्त्वाचे आहे.

- श्रीनिवास पाटील, खासदार

घर तुटल्यानंतर घरच्या विभागणीत कोणाकडे जावे, हा प्रश्‍न असतो; कारण घरातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम, निष्ठा असते. ही निष्ठा कोणाकडे दाखवायची, हा प्रश्‍न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो. त्यावेळी मनाला वेदना होतात. दादा, ताई की नेते शरद पवार याबाबत निर्णय घेताना आपण विरोधकांशी लढायचे सोडून आपण आपल्याच लोकांशी लढल्यासारखे होते. विरोधकांच्या कारवाईला आम्ही सहज सामोरे जाऊ शकतो; पण घरातील लोकांचे प्रेम विभागण्याचा विषय येतो, त्यावेळी निर्णय घेणे कठीण होते. मात्र, तो निर्णय आम्ही सद्‌सद्‌विवेक बुद्धीला पटेल, त्यापद्धतीने घेऊ.

- शशिकांत शिंदे (आमदार राष्ट्रवादी)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे.

- बाळासाहेब पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT