सातारा

श्रेयवादाची साथ पसरवू नका; शशिकांत शिंदेंच्या समर्थकांचा विराेधकांना टाेला

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : ल्हासुर्णे गावातील आरोग्य उपकेंद्राच्या मंजुरीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे काहीही संबंध नसलेल्या इतरांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये आणि तालुक्‍यात श्रेयवादाची साथ पसरवू नये, अशा शब्दांत सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला.
 
ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथे उभारलेल्या सुमारे दीड कोटींच्या आरोग्य उपकेंद्राचे उद्‌घाटन तसेच अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी शेड आणि कुंभारवाडा, माने आळी येथे पेव्हर्स बसवणे अशा एकूण एक कोटी 72 लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ श्री. जगदाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया सावंत यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

कऱ्हाड तालुक्‍यात पोलिस ठाणी वाहतूकशाखेविनाच; खाकीच्या खांद्यावर पडतोय भार

ते म्हणाले, ""शशिकांत शिंदेंच्या सूचनेनुसार ल्हासुर्णेत उपकेंद्रासाठी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव केला. त्यानंतर पाठपुरावा करुन या उपकेंद्रास मंजुरी मिळवली. शशिकांत शिंदे निवडून आले असते, तर ते नक्कीच कॅबिनेट मंत्री झाले असते. मात्र, पक्षनिष्ठेमुळे त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कामे अडणार नाहीत.'' सुप्रिया सावंत म्हणाल्या, ""या उपकेंद्राच्या कामाचे आता श्रेय घेणारे तीन वर्षांपूर्वी आमदार होते का? निवडून आल्यानंतर ते किती वेळा गावात आले?'' जयवंत भोसले, तेजस शिंदे, डॉ. नितीन सावंत, हभप डॉ. सुहास फडतरे यांचीही भाषणे झाली.

शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा, लोणंदात कॉंग्रेसचा एल्गार

भगवानराव घाडगे यांनी स्वागत केले. जगन्नाथ कुंभार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माजी उपसरपंच अधिक जाधव, वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष हभप प्रकाश सावंत, प्रकाश राजे, पोपटभाऊ सावंत, राजेंद्र घाडगे, शामराव इंगळे, बबन मौलवी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT