OBC Reservation esakal
सातारा

'OBC आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादीने काहीच प्रयत्न केले नाहीत'

हेमंत पवार

'आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने काहीच प्रयत्न केले नाहीत.'

कऱ्हाड (सातारा) : न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे यापुढील निवडणुका आरक्षणाशिवाय होतील, असे माझे म्हणणे आहे. आरक्षणासाठी शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काहीच प्रयत्न केले नाहीत. केंद्र व राज्य सरकारच्या कुचकामी व बेजबाबदार धोरणामुळे ओबीसी आरक्षण रखडले. आरक्षणासाठीचा शेवटचाच पर्याय म्हणून आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत, अशी माहिती काँग्रेसच्या (Congress OBC Cell) ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी (Bhanudas Mali) यांनी येथे दिली.

ओबीसी आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी नगरसेवक अशोकराव पाटील, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. माळी म्हणाले, ‘‘राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांनीही ओबीसी आरक्षणाबद्दल उदासीनता दाखवली आहे. राज्य सरकारने वरवर माहिती देणारा डेटा न्यायालयात दिला. त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी योग्य ती दिशा मिळाली नाही. पर्यायाने न्यायालयाने ती माहिती फेटाळली आहे. केंद्रानेही मनमोहन सिंग यांनी दिलेला डेटा परिपूर्ण असूनही तो दिला नाही.

राज्य सरकार आणि केंद्राच्या कुचकामी व बेजबाबदार धोरणामुळे ओबीसी आरक्षण रखडले आहे. आम्ही राज्यभर त्यासाठी मोर्चे काढणार आहोत. आता शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना भेटून आम्ही आमची कैफियत मांडणार आहोत. यापुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसेल. आम्ही काँग्रेस म्हणून २७ टक्के पक्षांतर्गत आरक्षण देणार आहोत. आमचे नेते नाना पटोले यांनी तसे जाहीरही केले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT