Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale esakal
सातारा

'हत्तीची गरज काय? तुम्ही अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन'

उमेश बांबरे

राजेशाही असती, तर हत्तीच्या पायाखाली देऊन 'त्यांना' चिरडलं असतं, असं विधान उदयनराजेंनी केलं होतं.

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील (Satara Industrial Estate) पंडित ऑटोमोटिव्‍हच्‍या (Pandit Automotive) जागेच्‍या कारणावरुन दोन्‍ही राजांच्‍यात टीकायुध्‍द सुरुय. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रराजे (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यातील विस्तव अजून गेलेला नाही, एकमेकांवर हल्लाबोल करण्याची संधी हे दोन्ही नेते कधीही सोडत नाहीत. कधी टोलनाक्यावरून तर मग कधी साध्या दारूच्या दुकानावरून अनेकदा वाद रंगलाय.

शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उदयनराजेंवर निशाणा साधलाय. पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन, असा टोला त्यांनी लगावला. पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय करणा-या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं पाहिजे, असं विधान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंचं नाव न घेता केलं होतं. त्याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिलंय.

सातारा एमआयडीसी (Satara MIDC) वाढत नसल्‍याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) असून उद्योजकांना धमकावणे, दमदाटी करणे, वसुल्‍या करायच्‍या आदी कामे ते आणि त्‍यांचे बगलबच्‍चे करतात. या व इतर अनेक कारणांमुळे सातारा एमआयडीसीऐवजी उद्योजकांनी इतर ठिकाणांना पसंदी दिल्‍याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinharaje Bhosle) यांनी केली. कारखानदारांकडून हप्ते घेणं, त्यांना दमटाटी करणं यामुळे सुद्धा साता-यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत आणि असलेल्या कंपन्या निघून गेल्या आहेत. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपूर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे, त्यामुळे उदयनराजेंचे हे आरोप बिनबुडाचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT