ShivPratap Day Pratapgad esakal
सातारा

Shivpratap Din : शिवरायांच्या जयघोषाने किल्ले प्रतापगड दुमदुमला; हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

किल्ले प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

आजचा शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला.

सातारा : जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषात आज (मंगळवार) किल्ले प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा किल्ले प्रतापगड आज शिवमय झाला होता. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाशी दोन हात करत याच गडावर खानाला संपवून प्रताप गाजवला होता. यामुळं या दिवसाला खूप महत्व प्राप्त आहे.

आजचा शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला. सकाळी किल्ले प्रतापगडवरील भवानी मातेची पूजा झाल्यानंतर शिवप्रताप दिन सोहळ्यास प्रारंभ झाला. यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

त्यानंतर प्रशासनाच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रमुख मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT