ST Staff Strike esakal
सातारा

ST Staff Strike : संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकारानं मृत्यू

उमेश बांबरे

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.

सातारा : एसटी विभागातील (Satara ST Division) मेढा आगारातील (Medha Depot) चालकाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. संतोष वसंत शिंदे (वय 34, रा. आसगाव, ता. सातारा) असं त्या चालकाचं नाव आहे.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff Strike) विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. शासनाकडून या संपावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वच एसटी कर्मचारी प्रचंड तणावा खाली आहेत. त्यानुसार चालक संतोष शिंदे हे गेली चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

संतोष यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. आता आणखी किती संतोष जाण्याची राज्य सरकार वाट पाहत आहे, असं प्रश्न सामान्य जनतेला पडला असून एसटी महामंडळ तत्काळ शासनात विलीन करावे, अशी मागणी जोर धरु लागलीय. कालच संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्‍या कारणावरुन सातारा आगारात (Satara Depot) कर्मचाऱ्यांच्‍या दोन गटात वाद झाला होता. वादात डोक्‍यास दगड लागल्‍याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे हे जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानने बिष्णोई समाजाची माफी मागणार का? 'भाईजान'ला कोणी दिला सल्ला?

Shafali Varma: शफाली वर्मावर ICC ची करवाई! झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रागात केलं होतं चुकीचं कृत्य, नेमकं काय?

Mika Singh: '...तर मी गाणं सोडेन!' का संतापला मिका सिंग?

Children Eye Health: मुलांना कमी वयातच चष्मा का लागतोय? मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होतोय परिणाम? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update : पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्यात भावनिक आणि आक्रमक भाषण; जातीच्या राजकारणावर कठोर शब्दांत प्रहार!

SCROLL FOR NEXT