बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला
बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला sakal
सातारा

येरळावरील बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला; उत्तर भागात तीव्र पाणीटंचाई

ऋषिकेश पवार

विसापूर : काटकरवाडी (ता. खटाव) हद्दीतील येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या सत्तर लोखंडी फळ्या चोरीला गेल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे पुसेगाव-काटकरवाडी परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुसेगाव ते वाकेश्वरपर्यंत सर्वच बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्याने उत्तर खटावमध्ये टंचाईची तीव्रता वाढणार आहे.

या ठिकाणच्या बंधाऱ्याला लोखंडी फळ्या टाकून दरवाजे बंद करावे लागतात. मात्र, बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला गेल्याने नदीपात्रातील पाणी न अडता वाहून जात आहे. परिणामी परिसरात एवढा मोठा बंधारा असूनसुद्धा पाणी साठणार नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. दरम्यान, या बंधाऱ्याच्या फळ्या टाकल्यानंतर जवळपास एक किलोमीटरच्या नदीपात्रात पाण्याचा साठा होतो. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पाण्याची सोय होते. मात्र, या पाणीसाठ्यामुळे वाळू तस्करीवर अंकुश येतो. त्यामुळे या चोरीशी परिसरातील वाळू तस्करांचा संबंध असल्याचे काटकरवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला गेल्याने परिसरातील शेतीसोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचे देखील नुकसान होत आहे. तरीदेखील संबंधित विभाग या बाबींकडे कानाडोळा करत असल्याचे लाभधारक सांगत आहेत. त्यामुळे बंधारा वाहून गेल्यावरच देखभाल, दुरुस्ती होणार का, असा प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.

"दहा वर्षांपूर्वी येरळा नदीवर झालेला काटकरवाडी हद्दीतील हा बंधारा निरुपयोगी झाला असून, त्याची वेळेवर देखभाल-दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तरच त्याचा उपयोग होईल, नाही तर बंधारा फक्त नावापुरता उरेल."

-ज्ञानेश्वर काटकर, ग्रामस्थ, काटकरवाडी

जिहे-कठापूर योजनेचे पाणीही नेरमध्‍ये पडणार

पुसेगावपासून वाकेश्वरपर्यंतच्या बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. काही दिवसांत जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर तलावात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांची देखभाल, दुरुस्ती झाली तरच शेतकऱ्यांचा फायदा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll 2024: दोन शिवसेनेच्या लढतीत AIMIM महाराष्ट्रातून हद्दपार? एक्झिट पोलने औवेसींना किती जागा दिल्या? 

Exit Polls चा खोटेपणा? दोन्ही शिवसेनेच्या आकडेवारीत मोठा घोळ तर पाच जागा लढवणारा पक्ष 6 जागांवर विजयी

गोफण | गांधी को किसका प्रेरणा था, मालूम है?

Raveena Tandon : कधी सवतीवर फेकलाय ज्यूस तर कधी मुलाला हाकललं सेटवरून ; या आधीही रवीनाने रागाच्या भरात केलाय तमाशा

Arunachal Pradesh and Sikkim election results 2024 Live: अरुणाचलमधील 60 पैकी 47 जागांवर भाजप आघाडीवर आहे, SKM सिक्कीममध्ये प्रचंड विजयाच्या मार्गावर आहे

SCROLL FOR NEXT