Vinod Shelar
Vinod Shelar esakal
सातारा

तरुणाची किमया! नोकरी सोडून गीर दुधातून मिळवला तब्बल तिप्पट दर

विकास जाधव

काशीळ (सातारा) : दूध दरातील घसरणीमुळे शेतीपूरक असणारा दुग्ध व्यवसाय (Dairy business) अडचणीत आला आहे. यामुळे सद्यःपरिस्थितीत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, एकसळ (ता. कोरेगाव) येथील विनोद शेलार (Vinod Shelar) या तरुण शेतकऱ्याने गीर गाईचे (Gir Cow) संगोपन करत या गाईच्या दुधाला (Cow's Milk) तब्बल तिप्पटीपेक्षाही अधिक दर मिळवत आहे, तसेच या गाईच्या शेणापासून धूप, अगरबत्ती, दिवे यांची निर्मिती करत आहेत. (Success Story Vinod Shelar From Koregaon Taluka Got A Good Product From Gir Milk Satara Marathi News)

विनोद हे मुंबईत खासगी कंपनीत नोकरीबरोबर अतिरिक्त उत्पन्नाची सोय म्हणून ते घरोघरी दूध वितरणाचे काम करायचे.

विनोद हे मुंबईत खासगी कंपनीत (Private company mumbai) नोकरीबरोबर अतिरिक्त उत्पन्नाची सोय म्हणून ते घरोघरी दूध वितरणाचे काम करायचे. त्या वेळी गावी एचएफ व जर्सी अशा सुमारे २० गायींचे संगोपन केले जायचे. त्या वेळी शेतकऱ्याला मिळणारा दर व ग्राहकांचे दर यातील तफावत जाणवायची. देशी दुधाला असलेली वाढती मागणी व बदलती बाजारपेठही विनोद अभ्यासत होते. या व्यवसायात चांगले ‘पोटॅंशियल’ आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून देशी गोपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

घराशेजारीच मोठ्या आकाराचा मुक्तसंचार पद्धतीचा गोठ्याची उभारणी केली. विनोद यांनी नोकरीतून मिळालेला ‘फंड’ व घरूनही अर्थसाह्य घेत गुजरात येथून गीर गायी टप्प्याटप्प्याने खरेदी केल्या. गोठ्यातही अनेक कालवडींची पैदास केल्याने त्यावरील मोठा खर्च वाचवला. दूधप्रक्रिया करण्यासाठी (पाश्चरायझेशन) २५० लिटर क्षमतेचे युनिट खरेदी केले. लहान-मोठी मिळून सुमारे १२० गीर देशी गायी केल्या असून, दैनंदिन २५० लिटर दुग्ध उत्पादन होत आहे.

Gir Cow

तिप्पट दर

गीर गाईच्या दुधास चांगला दर मिळण्यासाठी बहुतांशी दूध मुंबई येथे पाठवले जात आहे. मुंबईत विविध सोसायट्यांत सुमारे २२५ वर ग्राहक तयार केले आहेत. सध्या एचएफ जातीच्या गाईच्या दुधाला २२ रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. मात्र, विनोद यांना गीर गाईच्या दुधास सरासरी ११० रुपये दर मिळत आहे. घरपोच सेवेसाठी ‘पार्टटाईम’ करणाऱ्या मुलांद्वारे घरपोच विक्री व्यवस्था उभी केली आहे. कोरोनाच्या काळातही दुधास चांगली मागणी राहिली आहे.

शेलार फार्म नावाने ब्रँडिंग

गीर गाईच्या दुधास चांगली मागणी असते. गाईचे दूध काढल्यावर त्यांचे पाश्चरायझेशन युनिटमधून पाश्चरायझेशन केले जाते. दुधास प्लॅस्टिक पिशवीचा वापर न करता काचेच्या बॅाटल वापरल्या जातात, तसेच या दुधाचे ‘शेलार फार्म’ या नावाने ब्रँडिंग पॅकिंग करत काचेच्या बॅाटलमधून दूध पाठवले जाते.

शेणीपासून उत्पादित वस्तूची निर्यात

गीर गायीच्या शेणीस परदेशात मागणी असल्याचे कळल्यानंतर विनोद यांनी त्याचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. तूप, धूपकांडी, अगरबत्ती, दिवे यांची निर्मिती केली आहे. यातील प्रमुख वस्तू लॅाकडाउनपूर्वी काही परदेशातही निर्यात केली आहे. मात्र, लॅाकडाउनमुळे सध्या बंद असून, पुढील काळात निर्यात वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद यांनी मागील वर्षभरात ७० ते ८० किलोवर तूप निर्मिती केली असून, या तुपास किलोस २८०० ते ३००० रुपये दर मिळत आहे. या व्यवसायत कुटुंबातील सदस्यांची मोठी मदत होत असल्याचे विनोद सांगतात.

Success Story Vinod Shelar From Koregaon Taluka Got A Good Product From Gir Milk Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT