Talathi recruitment
Talathi recruitment sakal
सातारा

तलाठी भरती प्रक्रियेचा तिढा कायम ; मार्च २०१९ पूर्वीच्या कागदपत्रांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सन २०१९ मध्ये राज्य सरकारने राबवलेल्या तलाठी भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना केवळ मार्च २०१९ पूर्वीच्या कागदपत्रांची मागणी केल्यामुळे काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील ३३ जिल्ह्यांनी ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊनही सातारा जिल्ह्यातील ही भरती प्रक्रिया अडखळली आहे. काही उमेदवार पात्र असूनही त्यांना नियुक्तीपासून दूर राहावे लागल्याचे चित्र आहे.

‘‘राज्य शासनाने २०१९ मध्ये ३४ जिल्ह्यासाठी तलाठी भरती प्रक्रिया राबवलेली होती. ३३ जिल्ह्यांनी भरती प्रक्रिया राबवली. मात्र, सातारा जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सातारा जिल्ह्यासाठी ११४ पदांची भरती प्रक्रिया राबवली होती. सर्व प्रक्रिया राबवल्यानंतर तलाठी पदासाठी पात्र ठरलेले उमेदवार रोज जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करून भरतीबाबत विचारणा करत होते. मात्र, कार्यालयातील कर्मचारी रोज नवीन कारण देऊन निकाल लावण्यास व नियुक्‍त्या देण्यास टाळाटाळ करत होते. सर्व जिल्ह्यांतील उमेदवारांनी एकाचवेळी परीक्षा देऊनही फक्त सातारा जिल्ह्यातील उमेदवारांना दोन वर्षांनंतरही नियुक्ती देण्यात आली नव्हती. जिल्हा प्रशासनाने मार्च २०१९ पूर्वीची कागदपत्रांची मागणी केली होती. त्यामुळे काही विद्यार्थी या विरोधात न्यायालयात गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच ज्यांनी कागदपत्रे उपलब्ध केली, त्यांना नियुक्त्या दिल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे तलाठी भरती प्रक्रियेचा घोळ अद्याप मिटलेला नाही. मध्यंतरी यादी प्रसिध्दी न करताच काही उमेदवारांना पत्रव्यवहार करून रूजू करून घेतल्याचा आरोप होत होता. तसेच काही प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही अशी पत्रे प्राप्त झाली होती.

भरती प्रक्रियेतील नेमकी अडचण काय?

दरम्यान, जे उमेदवार अव्वल गुणांसह प्रारूप यादीत आहेत, त्यांना कोणताही पत्रव्यवहार झालेला नव्हता. त्यामुळे या भरती प्रक्रियेतील नेमकी अडचण सांगण्यास अधिकारीही धजावत नाहीत. नेमकी किती विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली गेली, किती विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत, याची माहिती स्पष्ट केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT