Somwar Peth School Satara Shahupuri Police esakal
सातारा

Satara School : मुलाला शिक्षा केली म्हणून शाळेत घुसून पालकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण

एका शाळेत विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षकाला (Teacher) मारहाण केल्यामुळे गोंधळ उडाला होता.

सकाळ डिजिटल टीम

रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

सातारा : येथील सोमवार पेठेतील एका शाळेत विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षकाला (Teacher) मारहाण केल्यामुळे गोंधळ उडाला होता. संबंधित शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवार पेठेतील शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षक गेले चार दिवस विविध कारणांवरून समज देत होते. त्यातूनच एका शिक्षकाने त्याला शिक्षा केली. याचा राग मनात धरून काल सकाळी शाळा भरताना संबंधित मुलाचे पालक गोंधळ करत शाळेत शिरले.

शाळेतील पर्यवेक्षक कक्षासमोर आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. योगायोगाने पहिला तास नसल्यामुळे संबंधित शिक्षक तिथेच होते. विद्यार्थ्याच्या पालकाने संबंधित शिक्षकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट समोर आल्यावर शाळेतील अन्य शिक्षक व उपस्थित पालकांनी शिक्षकाला त्यांच्या तावडीतून सोडवले.

त्यानंतर संबंधित शिक्षकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मार लागला असल्यामुळे पोलिसांनी संबंधित शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. दरम्यान, या प्रकाराची माहिती समजल्यानंतर शाळेत पालकसंघाची बैठक झाली. त्यामध्ये या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही शिक्षकाला अशाप्रकारे मारहाण होता कामा नये, काही तक्रारी असल्यास त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करता येऊ शकते. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Schools Closed India : देशात ५ वर्षांत १७ हजार सरकारी शाळा बंद, अहवालातून धक्कादायक माहिती उघड; शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

'श्री' पुन्हा परतला! शंशाक केतकरचं झी मराठीवर कमबॅक, 'या' मालिकेत एन्ट्री घेणार

Pimpri Chinchwad Metro: निगडी-चाकण मेट्रो मार्ग ‘डीपीआर’च्या टप्प्यात; सुमारे १३ हजार कोटींचा आराखडा, शहरात ‘रिंग मेट्रो नेटवर्क’चीही चर्चा

Latest Live Updates Marathi : विरार-भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT