koyna  sakal
सातारा

Satara : धरणातील गढूळ पाणी नदीपात्रात

कोयना नदीकाठच्या गावांत आराेग्याचा प्रश्‍न; आजारांनी डोके वर काढल्याने चिंता

सकाळ वृत्तसेवा

मल्हारपेठ : कोयना नदीच्या गढूळ पाण्याचे ग्रहण संपता संपेना, अशी स्थिती आहे. नदीकाठच्या गावांना जानेवारी महिन्यातही गढूळ पाणी प्यावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे अगोदरच आजारानेच डोके वर काढले असून त्यातच गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने आजारात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यंतरीच्या ढगफुटीसदृश पावसामुळे ओढे, नाले, दुथडी भरून वाहिले. अनेक ठिकाणी डोंगर उतारावरील गावात भूस्खलन झाले. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन अनेक नागरिकांना जिवास मुकावे लागले.

भूस्खलनाचे गाळमिश्रित पाणी साठल्याने धरणातून(koyna dam) पाणी सोडल्याने गाळासकट पाणी नदीत येत आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी दिसत आहे. भूस्खलनामुळे खूप गाळ धरणात साठल्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, पोटाचे विकार सुरू झाले आहेत. त्यातच सध्या कोरोनाचेही रुग्ण वाढले आहेत. मल्हारपेठ, नवारस्ता, पाटण येथील खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून भीती वाढत आहे.

पावसाळा(rain) पुन्हा सुरू होईपर्यंत आम्ही गढूळच पाणी प्यायचे का? शासनाने नदीकाठच्या पाणी शुध्दीकरण (water)यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तरी प्रश्न सुटेल.

- राहुल देसाई, उपसरपंच, त्रिपुडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT