Jarandeshwar Factory
Jarandeshwar Factory esakal
सातारा

साताऱ्यातील तीन कारखाने 'Top Ten'मध्ये; ऊस गाळपात कृष्णा, जरंडेश्‍वर, सह्याद्रीची बाजी

उमेश बांबरे

सातारा : यावर्षीच्या ऊस गाळप हंगामात सातारा जिल्ह्यातील जरंडेश्‍वर कारखाना (Jarandeshwar Factory), सह्याद्री साखर कारखाना (Sahyadri Factory) आणि कृष्णा कारखान्याने (Krishna Factory) राज्यात पहिल्या दहा कारखान्यांत आपले नाव नोंदविले आहे. त्यामध्ये सर्वाधिक गाळपात जरंडेश्‍वर शुगरचा पाचवा क्रमांक, तर साखर उताऱ्यात सह्याद्री कारखान्याचा राज्यात सहावा क्रमांक आला आहे. सर्वाधिक ऊस दर देण्यातही या तीन कारखान्यांचा समावेश झाला आहे. (The Top Ten Sugar Factories In Maharashtra Is Krishna Jarandeshwar Sahyadri In Satara District)

कोरोनाच्या संकटातच यंदा साखर हंगाम सुरू झाला. यामुळे अनेक कारखान्यांच्या तोडणी यंत्रणा विस्कळित होत्या.

कोरोनाच्या संकटातच (Coronavirus) यंदा साखर हंगाम सुरू झाला. यामुळे अनेक कारखान्यांच्या तोडणी यंत्रणा विस्कळित होत्या. अनेक कारखाने सुरवातीपासून ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला होता. या सर्व अडचणींवर मात करत सातारा जिल्ह्यातील 15 कारखान्यांनी हंगाम पूर्ण केला. जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 144 दिवस गाळप करून 99 लाख 8 हजार 21 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून एक कोटी 11 लाख 63 हजार 420 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी साखर उतारा 11.27 टक्के मिळाला आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्याचा साखर उतारा जास्त आहे. त्यामुळे पुढील हंगामात सहकारी कारखान्यांकडून जास्त दर मिळणार आहे.

या हंगामात "जरंडेश्‍वर', "सह्याद्री' व "कृष्णा' कारखान्याने आपले नाव राज्याच्या पहिल्या दहा कारखान्यांत नोंदविले आहे. उच्चतम गाळप केलेल्या पहिल्या दहा कारखान्यांत जरंडेश्‍वर शुगरचा पाचव्या क्रमांकावर बाजी मारत 14 लख 38 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे सर्वाधिक साखर निर्मितीतही तिसऱ्या क्रमांकावर असून, 16 लाख 56 हजार 150 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यापाठोपाठ सह्याद्री कारखान्याने 15 लाख 49 हजार 500, तर कृष्णा कारखान्याने 14 लाख 76 हजार 200 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. उच्चतम साखर उतारा मिळालेल्या पहिल्या दहा कारखान्यात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखान्याचा सहावा क्रमांक असून, या कारखान्याला 12.67 टक्के उतारा मिळाला आहे.

दर देण्यात पडले मागे....

गाळप आणि साखर निर्मिती व उताऱ्यात सातारा जिल्ह्यातील कारखाने अग्रेसर असले, तरी दरात मात्र, मागे पडले आहेत. राज्यात उच्चतम ऊस दर दिलेल्या पहिल्या दहा कारखान्यात जिल्ह्यातील एकाही कारखान्याचा समावेश झालेला नाही. अनेक कारखान्यांनी 80:20 चे सूत्र स्वीकारल्यामुळे दरात मागे पडले आहेत. काही कारखान्यांनी शेवटच्या टप्प्यातील ऊसबिलेही दिलेली नाहीत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अशावेळी कारखान्यांनी उर्वरित बिले दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

राज्यातील सर्वाधिक दर देणारे साखर कारखाने (कंसात दिलेला दर) ः सोनहिरा, कडेगाव (3176), कुंभी कासारी कुडित्रे, करवीर (3119), दूधगंगा वेदगंगा, बिद्री- कागल (3075), निनाईदेवी साखर कारखाना, करंगुळी- शिराळा (3053), पंचगंगा साखर कारखाना, हातकणंगले (3040).

The Top Ten Sugar Factories In Maharashtra Is Krishna Jarandeshwar Sahyadri In Satara District

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT