Police esakal
सातारा

'यल्या थांब, पळू नको'; महिला पोलिसाच्या मोबाईलवरच चोरट्याचा डल्ला

घरी निघालेल्या महिला पोलिसाच्या हातातील मोबाइल व कॅलसी हिसकावून चोरट्याने पळ काढला.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरी निघालेल्या महिला पोलिसाच्या हातातील मोबाइल व कॅलसी हिसकावून चोरट्याने पळ काढला. पोलिसांनी चोरट्याला ओळखून त्याच्या नावाने हाक मारल्याने चोरट्याने साहित्य टाकून पळ काढला.

याबाबत महिला पोलिस नाईक सरोजनी अजय शिंदे (रा. शाहूपुरी) यांनी यल्या अनिल कोळी (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार महिला पोलिस ठाण्यातील कामकाज संपवून घरी निघाल्या होत्या. त्या शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळ आल्या असताना यल्या कोळीने त्यांच्या हातातील मोबाईल व कॅलसी हिसकावून पळ काढला.

दरम्यान त्याचवेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार हसन तडवी हे निघाले होते. त्यांनी पळ काढणाऱ्या संशयिताला यल्या थांब, पळू नको, असा आवाज दिला. पोलिसांनी ओळखल्याच्या भीतीने संशयिताने मोबाइल व कॅलसी तेथेच टाकून आकाशवाणी झोपडपट्टीच्या दिशेने पळ काढला. तडवी यांनी संशयिताचा पाठलग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन त्याने पळ काढला.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Controversy : 'गोकुळ'मध्ये कौल आपल्यालाच मिळाला, अशा आविर्भावात राहू नका; आमदार सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचे जोरदार प्रत्युत्तर

पाकड्याचं थोबाड फोडलं! भारतीय बॉक्सरने सामन्यापूर्वीच पाकिस्तानी खेळाडूच्या कानाखाली जाळ काढला Video Viral

Drought Relief: दुष्काळी मदतीचे पैसे ;जमा होण्यास सुरुवात;दिवाळीआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update: अनिल अंबानी समूहाची आणखी ५१० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली

Gokul Chairman Controversy : 'गोकुळ'च्या माध्यमातून सहकाराच्या गाभ्यावरच घाला; सतेज पाटलांचं थेट संपादक, पत्रकारांना पत्र; 'महायुती'च्या संचालकांनाही केलं आवाहन

SCROLL FOR NEXT