Dahiwadi Crime News esakal
सातारा

दहिवडीत लाखोंची घरफोडी; फ्लॅट फोडून पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

सकाळ डिजिटल टीम

सतत होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दहिवडी (सातारा) : येथील एकतानगरमध्ये पुन्हा घरफोडी झाली असून, मध्यरात्री चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले. दरम्यान, दुसऱ्या घटनेत पांगरीजवळ आज दुपारी तीन वाजता रस्त्यात मागून येऊन मोटारसायकलवरील चोरट्यांनी दुसऱ्या मोटारसायकलस्वाराच्या हातातील मोबाईल हिसकावून धूम ठोकली.

याबाबत दहिवडी पोलिस (Dahiwadi Police) ठाण्यातून व प्रत्यक्ष मिळालेली माहिती अशी, एकतानगरमधील शारदा अपार्टमेंटमध्ये कार्तिकी देशमाने या राहतात. दोन दिवसांपूर्वी त्या गावी गेल्या होत्या. काल रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून गंठण, अंगठी, चेन, कानातले असे एकूण पाच तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लांबवला.

दुसऱ्या घटनेत राहुल नारायण काळे (रा. लोणी, ता. खटाव) हे बारामती येथून दहिवडीकडे येताना पांगरी गावाजवळ थांबले. त्याचवेळी तोंडावर रुमाल बांधलेल्या मागून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला व काही समजण्याच्या आत तेथून धूम ठोकली. दिवसाढवळ्या झालेल्या या लूटमारीने प्रवासी हादरले आहेत. एकतानगरमध्ये गेल्या वर्षभरात अनेक घरफोड्या झाल्या आहेत, तर कित्येक प्रयत्न फसले आहेत. सतत होणाऱ्या घरफोड्यांमुळे एकतानगरचे नागरिक त्रस्त झाले आहेत. बंद घरे हे या चोरट्यांचे लक्ष असते. याच परिसरात होणाऱ्या घरफोड्या हे चिंतेचे कारण बनले आहे. चोरटे सराईत व परिसरातच राहणारे असावेत, असा संशय व्यक्त होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT