Prithviraj Chavan esakal
सातारा

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला जामीन मंजूर

माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मेलवरून दिली होती जिवे मारण्याची धमकी

सकाळ डिजिटल टीम

आमदार चव्हाण यांच्या कार्यालयीन मेलवर रविवारी पहाटे धमकीचा मेल आला होता. आमदार चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी त्या मेलच्या माध्यमातून देण्यात आली होती.

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना मेलवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी पुणे येथील एकास अटक केली. अंकुश शंकरराव सवराते (वय २३, रा. आलेगाव, पो. कावळगाव, ता. पूर्णा, जि. परभणी. सध्या रा. बालाजीनगर, धनकवडी) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

त्याला काल दुपारी पोलिसांनी न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीनंतर बचाव पक्षातर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज देण्यात आला. त्यावर न्यायालयाने युवकाला जामीन मंजूर केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार चव्हाण यांच्या कार्यालयीन मेलवर रविवारी पहाटे धमकीचा मेल आला होता. आमदार चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी त्या मेलच्या माध्यमातून देण्यात आली होती. शहर पोलिस ठाण्यात त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तातडीने हालचाली सुरू झाल्या.

पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासातून संबंधित मेल नांदेडमधून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांचे पथक त्याच्या शोधार्थ रवाना झाले. त्यानंतर राजगड येथे आल्याची माहिती मिळाली. त्यावेळी दुसऱ्या पोलिस पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. रविवारी रात्री उशिरा त्याला कऱ्हाडात आणले.

त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दुपारी अंकुश सवरातेला दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याचा जामीन अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

संशयित बारावी शिकलेला

संशयित अंकुश याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो फार शिकलेला नाही, असे फौजदार राजू डांगे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘त्याचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही, असेही तपासातून दिसते आहे. तो त्याच्या परभणी येथील मूळ गावीही जास्त जात नाही, असेही त्याने सांगितले. तो धनकवडीत एका खासगी कंपनीत नोकरीस आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT