Accident on Patan-Koynanagar Road esakal
सातारा

Road Accident : पोलिस भरतीचं स्वप्न राहिलं कायमचं अधुरं! अपघातात दोन युवकांचा दुर्देवी अंत, एक गंभीर जखमी

या अपघाताची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

हेमंत पवार

पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता रनिंग करण्यासाठी गेलेल्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याने कोयना परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कराड (सातारा) : पाटण-कोयनानगर मार्गावर (Patan-Koynanagar Route) शुक्रवारी रात्री आयशर चारचाकी गाडी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील 2 जण ठार झाले. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

जखमींवर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस (Koynanagar Police) ठाण्यात झाली आहे. पोलिस भरतीची तयारी करणारे दोन्ही युवक अपघातात ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोयना विभागातील तोरणे येथील प्रसाद आनंदा कदम (वय 23) आणि प्रणय उत्तम कांबळे (वय 22, कोयनानगर हुंबरळी), धीरज संतोष बनसोडे (वय 18, नाशिक, सध्या रा. कोयनानगर) असे तिघे दुचाकीवरून निघाले होते.

गोषटवाडी गावाजवळ वळणावर समोरून आलेल्या आयशर टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात दुचाकीवरील धीरज संतोष बनसोडे हा युवक जागीच ठार झाला. तर, प्रणय उत्तम कांबळे याला उपचारासाठी गाडीतून नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुचाकी चालक प्रसाद कदम हा जखमी झाला असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता रनिंग करण्यासाठी गेलेल्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याने कोयना परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले. तर, सदरील अपघाताची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT