Udayanraje Bhosale system
सातारा

हॉस्पिटल उभारा अन्यथा कंपन्या सुरू करू देणार नाही : उदयनराजे

या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी खंडाळा तहसीलदारांना तातडीने जागा पाहण्याचे व कंपन्यांकडून हे हॉस्पिटल उभे करण्याचे आदेश बैठकीत दिले.

अश्‍पाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : खंडाळा तालुका कोरोनाचा (Coronavirus) हॉटस्पॉट ठरत असल्याने येथील कंपन्या बंद ठेवाव्यात व कंपनीमार्फत सुसज्ज हॉस्पिटल (Hospital) उभारावे, या मागणीसाठी येथे आंदोलन सुरू होते. यासंदर्भात शनिवारी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार मकरंद पाटील (Makrand Patil), जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, नितीन भरगुडे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व कंपनी प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत खंडाळा येथे सुसज्ज कोरोना हॉस्पिटल उभे करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला.

या वेळी सुनील काटकर, प्रा. एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, प्रदीप माने, एमआयडीसीचे इंगळे, सहायक कामगार आयुक्त रोकडे, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांच्यासह कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कंपनी प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप करत खंडाळा येथे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, प्रा. एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, प्रदीप माने, चंद्रकांत ढमाळ आदींनी आंदोलनाची व आत्मदहनाची भूमिका घेतली होती. याची दखल घेत आज सातारा येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी कंपन्याचे टर्नओव्हर किती? सीएसआर फंड कोणाला दिले? याची यादी कामगार आयुक्त, अधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी. कंपन्यांनी यापूर्वी कोरोना हॉस्पिटल उभे करायला हवे होते. निदान आता तरी तातडीने खंडाळ्यात मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल उभारावे, अन्यथा कंपन्या सुरू करू देणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. या वेळी आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे कोरोना केअर सेंटर नको, तर कोरोना हॉस्पिटल कंपनी माध्यमातून उभे राहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. नितीन भरगुडे-पाटील यांनी हे आंदोलन तालुक्‍यातील जनतेच्या हितासाठी होते. आमची मागणी मान्य झाल्याने हे आंदोलन मागे घेत आहोत, असे सांगितले. या वेळी प्रा. एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, प्रदीप माने यांनीही आपले मत व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी खंडाळा तहसीलदारांना तातडीने जागा पाहण्याचे व कंपन्यांकडून हे हॉस्पिटल उभे करण्याचे आदेश बैठकीत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT