Udayanraje Bhosale Eknath Shinde Devendra Fadnavis esakal
सातारा

Satara : वर्षापूर्वीची 'ती' मागणी पूर्ण होताच उदयनराजेंनी मानले CM शिंदे, फडणवीस, अजितदादांचे आभार; काय आहे प्रकरण?

शासनाच्या निर्णयामुळं छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा सर्वांनाच अखंड मिळत राहणार

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव ऐतिहासिक भूमीतील वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याबाबत आम्ही प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाची योग्य दाखल घेत आज शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

सातारा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिली.

ऐतिहासिक सातारा नगरीतील वैद्यकीय महाविद्यालयासारख्या मोठ्या महत्त्वाच्या वास्तूस समर्पक नाव दिल्याने छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या कार्यकर्तृत्वाचा योग्य तो सन्मान केला आहे, असं मतही खासदार उदयनराजे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव (Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College) दिल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की वैद्यकीय महाविद्यालय आमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सर्वांच्या सहकार्याने २०१४ मध्ये मंजूर झाले. त्यासाठी ५०० खाटांच्या अटींची पूर्तता, १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करण्यात आले.

त्यामुळे ५०० खाटांच्या रुग्णालयाची अट पूर्ण झाली. तथापि मेडिकल कौन्सिलच्या आणि इतर संस्थांच्या अनेक क्लिष्ट निकषांची पूर्तता करण्यात, तसेच महत्त्वाचे म्हणजे आवश्यक असणारी मोठी सोयीची जागा उपलब्ध करून घेण्यात बराच कालावधी लागला. त्यानंतर गेल्या वर्षी या महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया झाली. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने साताऱ्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागला.

या महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी राज्य शासनाकडे सुमारे एक वर्षापूर्वी केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या कऱ्हाड दौऱ्यात याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव दिला होता. मराठा साम्राज्याची तत्कालीन राजधानी असलेल्या साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची आवश्यक अशी नोंद घेतली गेली नाही, याची खंत आमच्या मनाला सातत्याने बोचत होती.

त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव ऐतिहासिक भूमीतील वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याबाबत आम्ही प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाची योग्य दाखल घेत आज शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा सर्वांनाच अखंड मिळत राहणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व मंत्रिमंडळाचे जनतेच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो, असेही उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT