Shivendrasinharaje Bhosle vs Udayanraje Bhosle esakal
सातारा

निवडणुकीत उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या आघाड्या आमने-सामने भिडणार

उमेश बांबरे

'निवडणुकीत आम्ही आमच्या ताकतीवर व स्वबळावर लढणार आहोत.'

सातारा : पालिकेच्या निवडणुकीसाठी (Satara Municipal Election) सर्व पक्षीयांनी तयारी सुरू केलीय. त्यांना आम्ही बंधन घालू शकत नाही; पण नगर विकास आघाडी पालिकेची निवडणूक स्वःतच्या ताकतीवर व स्वबळावर लढणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळं सातारा पालिकेत दोन्ही राजांच्या आघाड्या आमने-सामने भिडणार असल्याचे चित्र आहे.

सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र येतील, अशी साताऱ्यात चर्चा आहे. याविषयी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे मत पत्रकारांनी जाणून घेतले. त्यावेळी त्यांनी सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा बँकेत दोन्ही राजे बिनविरोध झाले असल्याने सातारा पालिकेतही दोघे एकत्र लढतील, अशी आशा सातारकरांना आहे. पण, शिवेंद्रसिंहराजेंनी मात्र नकार दिलाय. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही बिनविरोध झालो असलो तरी, माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला असता तरी माझी निवडणूक लढण्याची तयारी होती. मी कोणाचीही विनंती करायला, तसेच कोणाच्या पायऱ्या झिजवायला गेलो नव्हतो. उदयनराजेंचा (Udayanraje Bhosle) बिनविरोधचा निर्णय विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी घेतलाय. या निर्णयाशी माझा काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमच्या ताकतीवर व स्वबळावर लढणार आहोत. राष्ट्रवादीनेही (NCP) पॅनेलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याविषयी विचारले असता ते म्हणाले, असू देत कोणीही असुदेत शिवसेना (Shivsena), भाजप (BJP), आरपीआय (RPI) असू देत. त्यांना आपण बंधन घालू शकत नाहीत. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी ती लढवावी. आम्ही आमच्यापरीने तयार आहोत, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT