Fort Vardhangad Police Action esakal
सातारा

Vardhangad Fort : किल्ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवले; पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री अचानक कारवाई

किल्ले वर्धनगडावर असलेल्या वनविभागाच्या राखीव क्षेत्रात करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सूर्योदय होताच पावणेसात वाजता कारवाई सुरू करण्यात आली.

पुसेगाव : खटाव तालुक्यातील किल्ले वर्धनगडावर (Fort Vardhangad) राखीव वनक्षेत्रावर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम काल अचानक हटविण्यात आले. कमालीची गुप्तता पाळत वन विभागाने अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली.

यावेळी प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किल्ले वर्धनगडावर असलेल्या वनविभागाच्या राखीव क्षेत्रात करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

मंगळवारी पहाटे पोलिसांच्या बंदोबस्तात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही सुरू केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सूर्योदय होताच पावणेसात वाजता कारवाई सुरू करण्यात आली.

सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेकॉर्डवर नसलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. किल्ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची तयारी मध्यरात्रीपासूनच करण्यात आली होती. पहाटेपासूनच गडावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन अधिकारी, ३२ कर्मचारी, दोन स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईवेळी उपस्थित होते. यावेळी गडावर भाविकांसह सर्वांनाच प्रवेशबंदी करण्यात आली होती. प्रसिद्धी माध्यमांनाही मज्जाव करण्यात आला होता. मंगळवारी दिवसभर गडावर कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ‘स्थानिक’मध्ये महायुतीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमताचा विश्वास

Beed News : दिवाळी साजरी करताना हातातच फुटला फटाका; ६ वर्षाच्या मुलाला गमवावी लागली दृष्टी, बीडमधील दुर्देवी घटना...

Cracker Free Tamil Nadu Village: ना कर्णकर्कश्श आवाज, ना धूर...चैन्नईतील वेतांगुडीत पक्ष्यांसाठी फटाक्यांविना साजरी केली जाते दिवाळी

Crime: धक्कादायक! उपचारासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य, मुलीनं सांगितली आपबिती, क्रूर डॉक्टर अटकेत

Latest Marathi News Live Update : मुस्लिम समाजाला जवळ करण्याचे दत्तात्रय भरणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT