Vinod Wagh esakal
सातारा

खवळलेल्या समुद्राशी विनोदची झुंज अपयशी

विनोद ऍफकॉन कंपनीत नोकरी करत होते. या कंपनीने ओएनजीसीच्या समुद्रातील तेल उत्खनन प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम घेतले होते.

राहुल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : अरबी समुद्रात (Arabian Sea) आलेल्या तोक्‍ते या भयानक चक्रीवादळात (Cyclone Tauktae) अडकलेल्या "बार्ज पी 305' या जहाज दुर्घटनेत जाधववाडी (ता. कोरेगाव) येथील विनोद भाऊसाहेब वाघ (Vinod Wagh) (वय 38) या तरुणाचा मृत्यू झाला. (Vinod Wagh Of Jadhavwadi Dies In Shipwreck At Mumbai Satara Marathi News)

याबाबत माहिती अशी, की विनोद ऍफकॉन कंपनीत नोकरी करत होते. या कंपनीने ओएनजीसीच्या समुद्रातील तेल उत्खनन प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम घेतले होते. अनेक दिवस काम चालू होते. शेवटच्या दोन दिवसांचे काम बाकी असताना तोक्‍ते चक्रीवादळ आले. प्रशासनाने सूचना देऊनही ऍफकॉन कंपनीने जहाज समुद्राबाहेर काढले नाही. 16 तारखेला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळाने जहाजाला धडक दिली. जहाज हेलकावे खाऊ लागले. जहाजाने समुद्रात टाकलेले नांगराचे मोठे वायररूफ तुटले आणि जहाज समुद्रात भरकटले. अशा भयंकर परिस्थितीत विनोद शेवटपर्यंत त्याच्या साथीदारांना आधार देत होते. कर्मचाऱ्यांनी लाइफ जॅकेट घालून समुद्रात उड्या टाकल्या. विनोद तीन दिवस बेपत्ता होते.

काल त्यांचा मृतदेह भारतीय नौदलाला सापडला. आज दुपारी तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. ऍफकॉन कंपनीने कामासाठी नियुक्त केलेले 261 कर्मचारी बार्ज पी 305 वर कार्यरत होते. त्या वेळी तोक्‍ते चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे "बार्ज पी 305' मुंबईपासून 175 किलोमीटरवर भरकटले होते. चक्रीवादळाचा फटका हे कर्मचारी असणाऱ्या जहाजाला बसल्यामुळे त्यामध्ये 51 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 24 जण अद्याप बेपत्ता आहेत. विनोद यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब वाघ हे त्यांचे वडील, तर "सकाळ'चे वाठार स्टेशन येथील बातमीदार अतुल वाघ हे त्यांचे बंधू आहेत. विनोद यांच्या निधनाची बातमी समजताच जाधववाडी, विखळे, वाठार स्टेशन, तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबीयांचा हंबरडा

विनोद सुस्थितीत सापडतील, अशी अपेक्षा उराशी घेऊन त्यांचे कुटुंबीय मुंबईला रवाना झाले होते. अनेक कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे विनोद सुस्थितीत असेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र, त्यांचा मृतदेह सापडल्याचे समजल्यावर गावाकडील कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. आज रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर जाधववाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Video पहा : Coronafighter आजी काळाच्या पडद्याआड

Vinod Wagh Of Jadhavwadi Dies In Shipwreck At Mumbai Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT