Karad Gram Panchayat Election esakal
सातारा

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; कराडात सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त, 270 कर्मचाऱ्यांची नेमणूक

निवडणूक लागेल्या गावांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमले आहेत.

हेमंत पवार

आज सकाळी मोठ्या उत्साहात मतदानास प्रारंभ झाला. त्यासाठी २७० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कराड : कराड (जि. सातारा) तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी (Karad Gram Panchayat Voting) आज रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात मतदानास प्रारंभ झाला. कोणत्याही गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, भोसलेवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबीरवाडी, पिंपरी, शेळकेवाडी, येणपे, येवती, सयापूर, टेंभू या ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी मोठ्या उत्साहात मतदानास प्रारंभ झाला. त्यासाठी २७० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणूक लागेल्या गावांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही गावात काही कारणाने मतदान यंत्रात बिघाड झाल्यास त्या केंद्रावर तात्काळ यंत्रे उपलब्ध व्हावी यासाठी जादा यंत्रे देण्यात आली आहेत.

दरम्यान, कोणत्याही गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील गावात स्वतंत्र पथकामार्फत मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT